Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Exit Poll: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी विविध एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष्य लागलं आहे. या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची आणि पक्षाची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अशातच काही एक्झिट पोलनुसार काही नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामध्ये दापोलीत रामदास कदमांच्या मुलाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भरत गोगावले, बारामतीतून युगेंद्र पवार यांना धक्का बसणार असल्याचा अंदाज प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

दापोली मतदारसंघामध्ये रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम (शिवसेना शिंदे गट) महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत, तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संजय कदम हे उभे आहेत. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार भरत गोगावले यांना देखील धक्का बसण्याची शक्यता आहे. महाड मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) अशी लढत होत आहे, यामध्ये स्नेहल जगताप यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 

तर दुसरीकडे राज्याचं लक्ष्य लागलेल्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार विरूध्द युगेंद्र पवार आहेत यामध्ये युगेंद्र पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. तर आमदारकीच्या विजयाची माळ ही अजित पवारांच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलने दिलेल्या अदाजानुसार, यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. तर महायुतीला (Mahayuti) फक्त 127 जागा मिळू शकतात. या शक्यतेनुसार जागा मिळाल्यास महाविकास आघाडीला बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते. प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघ निहाय निकालाचे अंदाजही व्यक्त करण्यात आले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अहेरीतून धर्मरावबाबा अत्राम, अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुरजी पटेल, बारामतीतून अजित पवार यांचा विजय पक्का मानला जात आहे. आता हे अंदाज खरे ठरणार की बड्या नेत्यांना धक्का बसणार हे, 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यातील कोणते 32 उमेदवार विजयी होणार?

कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेनाद. प. नागपूर - देवेंद्र फडणवीस, भाजपबारामती - अजित पवार, राष्ट्रवादीकामठी - चंद्रशेखर बावनकुळे, भाजपरामटेक - अपक्ष, चुरशीची लढतअहेरी - धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादीभोकर - श्रीजया चव्हाण, भाजपकन्नड - उदयसिंग राजपूत, चुरशीची लढतपू. औरंगाबाद - इम्तियाज जलील, चुरशीची लढतसिल्लोड - अब्दुल सत्तार, शिवसेनायेवला - छगन भुजबळ, राष्ट्रवादीदिंडोरी - सुनीता चारोसकर, राष्ट्रवादी (शरद पवार)बेलापूर - संदीप नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार)जोगेश्वरी पूर्व - अनंत नर, शिवसेना ठाकरे गटवर्सोवा - हारुन खान, शिवसेनाअंधेरी पूर्व - मुरजी पटेल, भाजपशिवडी - अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गटमुंबादेवी - अमीन पटेल, काँग्रेसमहाड - स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गटदापोली - संजय कदम, शिवसेना ठाकरे गटउ. कोल्हापूर - राजेश क्षीरसागर, शिवसेनाकागल - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीतासगाव - रोहित पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)जत - विक्रमसिंह सावंत, काँग्रेसद. सोलापूर - सुभाष देशमुख, भाजपमाळशिरस - उत्तम जानकर, राष्ट्रवादी (शरद पवार)सांगोला - बाबासाहेब देशमुख, शेकापकोरेगाव - शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार)माढा - अभिजीत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)वाई - मकरंद पाटील, राष्ट्रवादीपलूस कडेगाव - राष्ट्रवादीइस्लामपूर - जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)मिरज - सुरेश खाडे, भाजप