Navneet Rana Latest News : नवनवीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पराभवचा धक्का बसला. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचा विजय झाला होता, त्या अपक्ष होत्या. अमरावतीमधील पराभवानंतर नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.  2019 मध्ये अमरावतीच्या जनतेने मला अपक्ष उमेदवार असतानाही दिल्लीत पाठविले, पण यावेळी मी  असं काय केलं की 2024 मध्ये जनतेने मला अमरावतीतच थांबण्यास भाग पाडले? असे नवनीत राणा म्हणाल्या. 


भाजप नेत्या नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी जिंकल्यासारखं वाटलं. फक्त मनात एका गोष्टीची खंत आहे, 2019 मध्ये अमरावतीच्या जनतेने मला अपक्ष उमेदवार असतानाही दिल्लीत पाठवले, पण यावेळी मी असं काय केलं की 2024 मध्ये जनतेने मला अमरावतीतच थांबण्यास भाग पाडले? माझा पराभव केला."






नवनीत राणा यांना किती मतं मिळाली?


अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना 526271 मिळाली. नवनीत राणा यांना 506540 मतं मिळाली. राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला. 57.46 टक्के मतदान झालं होतं. 


2019 मध्ये काय झालं ?


2019 मध्ये अमरावतीमधून नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव केला होता. नवनीत राणा यांना 510947 मते मिळाली. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली.  


नवनीत राणांच्या पराभवानंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा - 


अमरावती लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्विकारत अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
नवनीत राणा यांना अमरावती शहरात 75 हजार 54 मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांना 1 लाख 14 हजार 702 मतं मिळाली आहे. नवनीत राणा यांचा पराभव का? झाला यावर प्रवीण पोटे म्हणाले की, भाजपला मागील निवडणुकी पेक्षा यावेळी मतं जास्त मिळाली. त्यामुळे भाजपची पूर्ण मते नवनीत राणा मिळाली पण त्यांच्या व्यक्तिशः कारणामुळे काही ठिकाणी फटका बसला असं ही पोटे म्हणाले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार मधून मला मोकळं करावं यावर प्रवीण पोटे म्हणाले की फडणवीस साहेबांनी सरकार मध्ये राहून पक्ष वाढवावे अशी विनंती त्यांनी केली.