Malegaon Central Vidhan Sabha Election Result 2024 : मालेगाव (Malegaon) हे राज्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मुस्लिमबहुल वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. मोहम्मद इस्माइल अब्दुल खलिक (Mohammad Ismail Abdul Khalique) हे मालेगाव मध्य मतदारसंघाचे (Malegaon Central Assembly Constituency) विद्यमान आमदार आहेत. एमआयएमने त्यांना 2019 मध्ये तिकिट दिले होते. या तिकिटावर ते निवडून आले. असदुद्दीन ओवैसी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तर महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाने या मतदारसंघात  समाजवादी नेते (कै) निहाल अहमद यांच्या कन्या शाने-ए-हिंद डिग्निटी यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच आसिफ शेख हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे मुस्लीम समाजाचे वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाची एमआयएमला राखण्यात यश आले आहे. मात्र, मौलाना मुफ्ती यांचा केवळ 84 मतांनी निसटता विजय झाला आहे. 


 2009 सालच्या निवडणुकीत मुफ्ती मोहम्मद इस्माइल ए. खलीक जनथीपाठी संरक्षण समितीचे उमेदवार होते. त्यांना 71 हजार 157 मतं पडली होती. त्यांनी शेख रशीद हाजी शेख शफी यांचा पराभव केला होता. तर 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत शेख आसिफ राशीद हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना 75 हजार 326 मते मिळाली. तर मुफ्ती मोहम्मद इस्माइल कास्मी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले मात्र त्यांना 59 हजार 175 मतं मिळाली. 2019 च्या निवडणुकीत मोहम्मद इस्माईल खलीक हे एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले. त्यांना 1 लाख 17 हजार 242 मतं मिळाली. तर आसिफ शेख राशीद हे काँग्रेसच्या तिकिटावर लढले. त्यांना 78 हजार 723 मतं मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत मोहम्मद इस्माईल खलीक हे एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले. तेव्हापासून या मतदारसंघात एमआयएमचं वर्चस्व आहे.  


मालेगाव मध्य मतदारसंघातून मौलाना मुफ्ती पुन्हा विजयी


आता एमआयएम पक्षाचे मौलाना मुक्ती अहमद हे पुन्हा एकदा उमेदवारी केली. तर  असिफ शेख यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाच्या नावाचे लघुरूप इस्लाम असे करण्यात आले. मात्र त्या नावावर आक्षेप घेतल्याने माजी आमदार असिफ शेख हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसेच समाजवादी पक्षाने सलग सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले समाजवादी नेते (कै) निहाल अहमद यांच्या कन्या शाने-ए-हिंद डिग्निटी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मालेगाव शहराचे यंदाचे राजकारण आणि निवडणूक दोन्हीही अतिशय गुंतागुंतीची बनली होती. मात्र मौलाना मुफ्ती यांचा विजय झाला आहे.