मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ (Baramati Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीतील काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच अजित पवार यांनी मी बारामतीमध्ये 1 लाखाहून अधिक मतांनी जिंकणार, असा ठाम विश्वास वक्तव्य केलाय. 


अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात बारामतीत सामना रंगला. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 


मी बारामतीमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन


आता बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पुतणे युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आता अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीत 175 हून अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून मी लाखांहून अधिक मतांनी जिंकणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 


विधानसभेला मला मतदान करा : अजित पवार 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला आणि मी तो स्वीकारला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी हक्काने तुमच्याकडे मते मागण्यासाठी आलो आहे. यावेळी मला खूश करण्यासाठी विधानसभेला मला मतदान करा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मीही निवृत्त होणार पण..; शरद पवारांचे नाव घेऊन अजित पवारांनी दिले संकेत, वारसदाराबद्दल काय म्हणाले?


IANS- MATRIZE Survey: तुतारीची जोरदार हवा, पण पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा करिष्मा चालणार की नाही? ओपिनियन पोलची आकडेवारी समोर