Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) चे सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. तर राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, आज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता सुरु झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर आता ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी केली जात आहे. मात्र, मतमोजणीच्या टप्प्या-टप्प्यात वेगाने आकडे बदलत आहेत.


दरम्यान, हाती आलेल्या सुरुवातीच्या कलानुसार नागपूर जिल्हा एकूण जागा 12 पैकी भाजपने 8 ठिकाणी आघाडी घेतली आहे. त्यात दक्षिण-पश्चिम नागपूर, दक्षिण नागपूर, पूर्व नागपूर, पश्चिम नागपूर, हिंगणा, कामठी, सावनेर, काटोल चा समावेश आहे. तर काँग्रेसने मध्य नागपूरसह उत्तर नागपूर आणि उमरेड मध्ये आघाडी घेतली आहे तर रामटेक मध्ये अपक्ष उमेदवार पुढे असल्याची माहिती आहे.



  • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा


देवेंद्र फडणवीस भाजप - १३७१२ 


प्रफुल्ल गुडधे (काँग्रेस) - ६९०१ 


देवेंद्र फडणवीस यांची 6811 मतांची आघाडी.



  • नागपूर दक्षिण विधानसभा (फेरी 1)



गिरीश पांडव (काँग्रेस) :4141
मोहन मते (भाजप): 5106


 मोहन मते यांची 1065 आघाडी.


नागपूर दक्षिण विधानसभा (दुसरी फेरी) 


मोहन मते ( भाजप) - 4865
गिरीश पांडव (काँग्रेस) - 2087


भाजप चे मोहन मते यांना दुसऱ्या फेरीत 2778 मतांनी आघाडीवर
 मोहन मते यांना एकूण 3843 मतांची आघाडी


पूर्व नागपूर विधानसभा (फेरी 2)


कृष्णा खोपडे (भाजप):  आघाडी
दूनेश्वर पेठे  (राष्ट्रवादी):
आभा पांडे  (अपक्ष):
पुरुषोत्तम हजारे (अपक्ष)


राऊंड लीड :
एकूण लीड : 11000



  • रामटेक - (फेरी 2)


आशिष जयस्वाल - १०३२९
राजेंद्र मुळक - ९९४३
चंद्रपाल चौकसे- ५१९
विशाल बरबटे - ४१४



  • नागपुर जिल्हा


एकूण जागा 12


भाजप - दक्षिण पश्चिम, दक्षिण, पूर्व, पश्चिम, हिंगणा, कामठी, सावनेर, काटोल, 


काँग्रेस - मध्य, उत्तर, उमरेड


अपक्ष - रामटेक....


भाजप 8
काँग्रेस 3
अपक्ष 1



  • सावनेर 


काँग्रेस अनुजा केदार - 3091 


भाजप आशिष देशमुख - 3818 


भाजपचे आशिष देशमुख आघाडीवर



  • विदर्भ - 


१) चंद्रपूर - भाजप ५, शेतकरी संघटना १


२) अमरावती - भाजप ३, कॅाग्रेस १


३) यवतमाळ- भाजप - २, कॅाग्रेस २, दादा - १, शिंदे - १  उबाठा ०१ 
 
४) गोंदिया - भाजप ४ आघाडीवर 


५) भंडारा - कॅाग्रेस १, महायुती २


६) अकोला - भाजप ३, महाविकास आघाडी २


७) वर्धा - भाजप ३, कॅाग्रेस 


८) नागपूर - भाजप ५, कॅाग्रेस ३, शिवसेना शिंदे १


९) बुलडाणा-  भाजप ४, शिंदे ३


भाजप 29
काँग्रेस 11
शिवसेना शिंदे 2
राष्ट्रवादी अजित 1
शेतकरी संघटना 1


कामठी विधानसभा क्षेत्रात भाजप महायुतीचे चंद्रशेखर बावनकुळे तिसऱ्या फेरी अखेर 4414 मताने आघाडीवर



  • अमरावती जिल्हा

    अमरावती - फेरी 4 महायुतीच्या सुलभा खोडके 3297 मतांनी आघाडीवर...


    बडनेरा फेरी  1 युवा स्वाभिमानचे रवी राणा 941 मतांनी आघाडीवर..


    दर्यापूर फेरी  1- ठाकरे गटाचे गजानन लवटे 105 मतांनी आघाडीवर..


    धामणगाव - फेरी 5 भाजपचे प्रताप अडसड 3100 मतांनी आघाडीवर..


    मोर्शी - फेरी 1 भाजपचे उमेश यावलकर 1195 मतांनी आघाडीवर..


    अचलपूर - फेरी 2 भाजपचे प्रवीण तायडे 4131आघाडीवर...


    मेळघाट - फेरी 2 भाजपचे केवलराम काळे 2300 मतांनी आघाडीवर..


    तिवसा - फेरी 1 भाजपचे राजेश वानखेडे 743 मतांनी आघाडीवर...




इतर महत्वाच्या बातम्या