यवतमाळ : यवतमाळमध्ये 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती आमने सामने आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला इथून यश मिळालं होतं. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला पुसदची जागा मिळाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मविआला कौल दिला होता. आता यवतमाळ जिल्ह्यातील मतदार विधानसभा निवडणुकीत कुणाच्या बाजून मतदान करतात ते निकालानंतर दिसून येईल. यवतमाळ  जिल्ह्यातील 7 मतदारसंघांच्या लढती ठरल्या आहेत. 


यवतमाळ मध्ये कोण आमने सामने?


यवतमाळ विधानसभा मतदारसंघ : अनिल उर्फ बाळासाहेब मांगळुकर (काँग्रेस) विरुद्ध मदन येरावार (भाजप)
वणी विधानसभा मतदारसंघ : संजय देरकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध  संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार (भाजप)
राळेगाव विधानसभा मतदारसंघ : वसंत पुरके (काँग्रेस) विरुद्ध  अशोक उईके (भाजप)
अर्णी विधानसभा मतदारसंघ :  जितेंद्र मोघे ( काँग्रेस) विरुद्ध  राजू तोडसाम (भाजप) 
उमरखेड विधानसभा मतदारसंघ : साहेबराव कांबळे (काँग्रेस) विरुद्ध  किसन वानखेडे (भाजप) 
पुसद विधानसभा मतदारसंघ  शरद मेंद, (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) विरुद्ध : इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
दिग्रस विधानसभा मतदारसंघ :  माणिकराव ठाकरे (काँग्रेस) विरुद्ध  संजय राठोड (शिवसेना) 


मविआत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा


महाविकास आघाडीत यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. यवतमाळमधून बाळासाहेब मांगुळकर, राळेगावमधून वसंत पुरके, अर्णीतून जितेंद्र मोघे, उमरखेडमध्ये साहेबराव कांबळे आणि दिग्रसमध्ये माणिकराव ठाकरे लढत आहेत. म्हणजेच पाच जागा काँग्रेसकडून लढवल्या जात आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला वणी विधानसभा मतदारसंघाची जागा देण्यात आली आहे. तिथून संजय देरकर निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुसदची जागा लढवली जात असून तिथं शरद मेंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा


महायुतीत भाजप देखील सर्वाधिक जागा लढवत आहे. भाजपकडून तीन मतदारसंघात विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मदन येरावार, संजीव रेड्डी बापुराव बोदकुरवार आणि अशोक उईके या आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आहे. किसन वानखेडे आणि राजू तोडसाम यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुसदमधून इंद्रनील नाईक यांना संधी देण्यात आली आहे. 


दिग्रसमध्ये राठोड विरुद्ध ठाकरे


दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण इथून मंत्री संजय राठोड आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे रिंगणात आहेत. 


इतर बातम्या :


Arni Assembly Election 2024 : अर्णीत भाजप अन् काँग्रेस पुन्हा आमने सामने, राजू तोडसाम- जितेंद्र मोघे रिंगणात, विष्णू उकंडे रिंगणात असल्यानं ट्विस्ट