Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik  : कोल्हापूरचा मुन्ना धमकी देतोय. मी त्याला सांगतो तू माझ्या माता बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्यावर हल्लाबोल केला. लाडकी बहिण योजनेवरुन भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्याव उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश धात्रक यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची आज मनमाड शहरात सभा होत आहे. यावेळी ते बोलत होते.


तुमच्यासाठी लढणारा आमदार पाहीजे की रडवणारा आमदार पाहीजे आमदार पाहिजे की डाकू पाहीजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दारांनो तुमचा पापाचा घडा फोडून तुरुंगात कांदे सोलायला पाठवेल असेही ठाकरे म्हणाले. शेवटच्या ओव्हरमध्ये चौकार षटकार मारायचे आहेत. मातृशक्तिला नमस्कार करतो. संभाजीनगरमध्ये गेलो तिथला मिंधेंचा उमेदवार म्हणतो मतं दिले नाही तर 3 हजार परत घेऊ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तुझी खेटराने पूजा करायची का? पोलीस आणि गुंड घेऊन फिरतो. मीच तुम्हाला हा उमेदवार दिला माझेच दुर्दैव आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी कांदे यांच्यावर टीका केली. 


निष्ठावंतच्या हातात तुमचे भविष्य द्यायचे की गद्दाराच्या हे ठरवा


 आमचं सरकार महिलांना सुरक्षा देणार, 3 हजार रुपये देणार, पुन्हा शेतकरी कर्जमुक्त करायचे आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळं मशाल पेटवायची आहे. इथे आलेल्या माता बघिनींचे आशीर्वाद पाहिजेत. आई वडीलाचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्ही जर मर्दाची औलाद असाल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लाव. त्या दाढीवाल्या मिंधेलाही सांग तुझ्या वडिलांचा फोटो लाव असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. निष्ठावंतच्या हातात तुमचे भविष्य द्यायचे की गद्दाराच्या हे ठरवा असेही ठाकरे म्हणाले. 


ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्र च्या मुळावर आहेत त्याच गोष्टी मोदी शाहा करत आहेत. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे, म्हणून अनेक मुले शिक्षण घेत नाहीत. आपले सरकार आल्यावर मुलांना मोफत शिक्षण देणार आहे. सोयाबीन आणि कांद्याचे भाव पडत आहेत असे ठाकरे म्हणाले. मोदी आणि अमित शाह हे गद्दाराचा प्रचारासाठी येत आहेत. आपले नाव ,निशाणी, सुख समाधान चोरले आणि अगदी बेशरम पणाने फिरतोय असेही ठाकरे म्हणाले.