Aditya Thackeray : गेल्या 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. तरीदेखील भाजप म्हणत असेल की हिंदू खतरे मे है तर मग इकडे भाजप नसलेली बरी असे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टोला लगावला. मुंबईला केंद्र शासित करू शकत नाहीत हे त्यांना कळलं आहे. शिवसेना असताना आपण जिंकू शकत नाही हे भाजपला कळल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ही निवडणूक महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकारं पाहिली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसरमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. तुम्हाला महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर मशाल निवडावी लागेल असेही ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंची महायुतीवर जोरदार टीका
आपली अडीच वर्ष आणि अगोदरची अडीच वर्ष त्याची तुलना केली तर राज्याला कुठं नेलं आहे हे बघा असे आदित्य ठाकरे म्हणाले. चुकून मशाल पेटली नाहीतर 23 तारखेनंतर हे महाराष्ट्राला अदानी राष्ट्र करायला मागे पुढे बघणार नाहीत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला. पिढ्यानंपिढ्या आपण इथं राहतोय या मुंबईत मंत्रालयात गेलात तर एक फुट तरी फुकटात मिळणार नाही मग अदानी कोण लागून गेलेत त्यांना 1080 स्केवर फूट फुकटात मिळायला असे आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्हाला महाराष्ट्राच नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मशाल निवडावी लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसळकर यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेली त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत
हे भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत. मराठी गुजराती वाद नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री येऊन आम्हाला विकास शिकवत आहेत. तर मी त्या योगी साहेबांना सांगतोय तुम्ही आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. ही विधानसभेची निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकार पाहिली आहेत. राज्यातील अंधार दू करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावी लागेल असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
राज्यात सरकार आणण्याचा उद्देश, महाराष्ट्रासाठी लढतोय, मित्रपक्षांसाठी देखील लढतोय, पदांची लालसा नाही : आदित्य ठाकरे