Shevgaon Assembly Constituency 2024 : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पाथर्डी मतदारसंघात विद्यमान आमदार मोनिका राजळे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. दुसरीकडे मोनिका राजळे  यांच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढण्यास सुरुवात झाली आहे. अशात आता महाविकास आघाडी कोणता डाव टाकणारहे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. 


शेवगावमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला होता. 2019 मध्ये शेवगाव विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी लढत झाली (Assembly Election 2024) होती. भाजप उमेदवार मोनिका राजीव राजळे या 1, 12, 509 मतांनी विजयी झाल्या होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा 14, 294 मतांनी पराभव झाला होता. तर भाजपने आपली विजयाची फताका शेवगावमध्ये फडकवली होती.


2014 ची विधानसभा निवडणूक


शेवगावमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने विजय मिळवला होता. 2014 मध्ये शेवगाव विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी चुरशीची लढत झाली होती. भाजप उमेदवार मोनिका राजीव राजळे या 1, 34, 685 मतांनी विजयी झाल्या होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा 53, 185 मतांनी पराभव झाला होता. आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवगावमध्ये भावी आमदार कोण असणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.