Ashutosh Kale Kopargaon Assembly Election 2024 : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांचा एकतर्फी विजय कोपरगाव मतदारसंघात झाला आहे. तब्बल एक मतांनी काळे यांनी विजय मिळवला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आशुतोष काळे आघाडीवर होते. राज्यात विक्रमी मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांमध्ये आशुतोष काळे यांचे नाव आहे. कारण त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल 1 लाख 24 हजार 624 मतांनी पराभव केला. आशुतोष काळे यांना 1,60,042 मते मिळाली तर संदीप वर्पे यांना 36,204 मते मिळाली.
कोपरगाव तालुक्याचे राजकारण हे माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे यांच्याभोवतीच फिरते. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते तसेच ते 35 वर्ष आमदारही होते. तर अशोक काळे हे 2004 आणि 2009 मध्ये आमदार होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आशुतोष काळे हे विधानसभेच्या रिंगणात उतरले.
2014 मध्ये आशुतोष काळे हे विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे या विजयी ठरल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा काळे आणि कोल्हेंमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. 2019 ला भाजपकडे असलेला मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आशुतोष अशोकराव काळे यांनी स्नेहलता कोल्हेंना पराभूत करत कोपरगावमध्ये विजयाची बाजी मारली होती. आशुतोष काळे 87, 566 मतांनी विजयी झाले होते.