मुंबई : महायुतीमधील जागावाटपाची आकडेवारी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही, काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात याची उत्सुकता आहे. किमान जागा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका अजित पवार यांनी मांडली असून, मुख्यमंत्री शिंदे गटालाही अधिक जागा हव्या असल्याने तिढा वाढण्याची शक्यता आहे. महायुतीत जागावाटपात शिंदे गट राष्ट्रवादीवर वरचढ ठरतो की काय असा सवाल उपस्थित होत आहे.
अजित पवारांनी दावा केलेल्या तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार जाहीर केले आहे. जागावाटपासंदर्भात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आहे. या बैठकीत जागावाटपातील घोळासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेनेच्या यादीत कन्नड, घनसावंगी, सिंदखेड राजा, श्रीरामपूरची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवारांना अवघ्या 51 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. महायुतीत शिंदे गटाचे 80 जागांवर उमेदवार आहे.
आजच्या बैठकीकडे लक्ष
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या 51 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. भाजपनंतर महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने सर्वाधिक 78 जागांवर आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. काल शिवसेनेकडून उमेदवारांची तीन यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत कन्नड,घनसावंगी,सिंदखेड राजा,श्रीरामपूर या विधानसभा मतदार संघावर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. पण या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेने उमेदवार उभे करत जागा वाटपामधील आपली ताकद दाखवून दिली आहे. जागा वाटपाच्या झालेल्या या घोळाच्या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बैठक होणार आहे.
महायुतीचा फॉर्म्युला अजूनही निश्चित नाही
महायुतीचा फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. आतापर्यंत 288 पैकी 282 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजप 146,शिवसेना 78,राष्ट्रवादीचे 51 उमेदवार जाहीर झालेले आहेत. महायुतीत चार मित्र पक्षांच्या वाट्याला 7 जागा आल्या आहेत. महायुतीच्या 7 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा झालेले नाही. महायुतीचे उमरेड,मालेगाव मध्य,मीरा भायंदर,शिवडीचे उमेदवार बाकी आहेत. महायुतीचे मानखुर्द-शिवाजीनगर,बीड आणि माढ्याचे उमेदवार बाकी आहे. महायुतीत मित्रपक्षांना 7 जागा जाहीर झाले आहेत. रिपाइं,जनसुराज्यला 2-2 जागा राजश्री शाहू आघाडी,युवा स्वाभिमानी आणि रासपला प्रत्येकी एकेक जागा मिळाली आहे.
हे ही वाचा :