Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी सर्वच पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारांच्या पहिल्या याद्याही आल्या आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील  चोपडा तालुक्यातून विद्यमान आमदार लता सोनवणे यांची उमेदवारी डावलल्याची चर्चा सध्या सुरु आहे. जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यानं बायकोऐवजी लता सोनावणे यांचे पती माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं शिंदे गटाचा निर्णय बदलल्याची चर्चा आहे.


दरम्यान, जनतेचा कौल लक्षात घेऊन पक्षानं उमेदवारी दिल्याचं माजी आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणालेत.


जातप्रमाणपत्राचा प्रकार नक्की काय?


लता सोनवणे यांनी २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरून त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विरुद्ध पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश वळवी यांनी त्यांच्या विरोधात अर्ज केला होता. यातून जात पडताळणी समितीनं लता सोनवणे यांच्या कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला होता. हाच निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालयात कायम राहिला होता. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा सुरु होती.


जनतेचा कौल लक्षात घेऊन उमेदवारी


प्रा चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचानंतर त्यांनी पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आणि विश्वास दाखविला त्याचा आपल्याला आनंद आहे.आ. लता सोनावणे यांच्या जात प्रमाणपत्रबाबत अडचण निर्माण झाली आहे,या विषयाच्या बाबत आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. तांत्रिक अडचणीमुळे लता सोनावणेयांच्या एवजी पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केली असल्याचा खुलासा केला. लता सोनावणे यांनी त्यांच्या मतदार संघात जी विकास कामे केली आहेत ती कामे पाहता ,जनेतेचा कौल लक्षात घेऊन पक्षाने आमच्यावर विश्वास दाखविला आहे. असेही ते म्हणाले.


जनतेच्या सुख दुःखात सहभागी झालो आहोत तसा मतदार संघात केलेला विकास पाहता जनता पुन्हा एकदा आपल्याला विजयी करेल असा विश्वास  चोपडा विधान सभा मतदार संघाचे उमेदवार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. असेही ते म्हणाले.