Ambegaon Assembly Election 2024: आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र, पक्षातील फुटीनंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात काय होणार याकडे आता लक्ष्य लागलं होतं. पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांनी आपला मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात येश मिळवलं आहे. दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या 1661 मतांनी विजय झाला आहे. विद्यमान सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात तळागाळापर्यंत जनसंपर्क आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील 1990 पासून आमदार आहेत. आंबेगाव शेवटच्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा ती अतिशय अतितटीची लढत ठरली होती. मात्र, अखेरीस दिलीप वळसे पाटील यांचा कमी मतांच्या फरकाने विजय झाला आहे.
देवदत्त निकमांविरोधात दिलीप वळसेंचा निसटता विजय
दिलीप वळसेंचा एका डावाने देवदत्त निकमांचा विजय हिरावून घेतलाय. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या देवदत्त निकमांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह हे ट्रॅपेट होते. ट्रॅपेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा वळसेंनी करून घेण्याची खेळी केली, जी वळसेंना तारणारी ठरली. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या 1661 मतांनी झाला, तर अपक्ष देवदत्त शिवाजी निकमांना 2900 हुन अधिक मतं मिळाली आहेत. शरद पवारांचे देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2900 मते शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांना मिळाली असती. त्यामुळं दिलीप वळसेंनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकमांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसेंचा पराभव झाला असता. त्यामुळं शरद पवारांच्या देवदत्त निकामांविरोधात विजयी मिळवताना वळसेंना देवदत्त शिवाजी निकमांनी तारले असंच म्हणावं लागेल.
दिलीप वळसेंची खेळी ही देवदत्त निकमांची डोकेदुखी ठरली आहे. कारण देवदत्त शिवाजी निकम या नावात साधर्म्य असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला 2438 मते मिळाली आहेत. दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या 1661 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिन्हाचा आणि नावाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाला बसल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे अपक्ष देवदत्त शिवाजी निकम यांचे चिन्ह ट्रॅपेट (आधी याला तुतारी म्हटलं गेलं होतं) आहे
आंबेगाव विधानसभेतील राजकीय वर्चस्वाबद्दल सांगायचं तर, 1972 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने 5 वेळा आणि काँग्रेस पक्षाने 3 वेळा या जागेवरून निवडणूक जिंकली आहे. याशिवाय गेल्या 5 निवडणुकांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली असून दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. 2019 च्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेचे राजाराम भिवसेन बाणखेले यांचा 66775 मतांनी पराभव केला होता.
आंबेगाव निकाल आला समोर
दिलीप वळसे - 1 लाख 6 हजार 95
देवदत्त जयवंतराव निकम - 1 लाख 4 हजार 434
देवदत्त शिवाजी निकम - 2955
दिलीप वळसे यांचा 1661 मतांनी विजय
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षफुटीआधी देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून निकम यांना आंबेगावमधून उमेदवारी दिल्यामुळे आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात रंगतदार सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.