अकोला: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा तब्बल 29 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाला कसरत करावी लागली आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 29 वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे ज्येष्ठ नेते, तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लोकसभा निवडणुकीबरोबर अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, उच्च न्यायालायानं ही निवडणूक रद्द केली. शर्मा यांनी तळागाळात पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करून अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. सलग सहा निवडणुकांत विजय खेचून आणणाऱ्या शर्मा यांच्या पश्चात ती परंपरा कायम राखण्याचं आव्हान भाजपपुढे होतं. मात्र भाजपच्या ताब्यातून गड काँग्रेसकडे गेला आहे.

Continues below advertisement

अकोला पश्चिम :

एकूण मतदार : 351092झालेले एकूण मतदान : 204060नोटा : 1257अवैध मते : 172रद्द केलेली मते : 44

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

Continues below advertisement

उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते

साजिदखान पठाण  काँग्रेस       88718विजय अग्रवाल        भाजप       87435हरीश आलिमचंदानी  अपक्ष        21481डॉ. अशोक ओळंबे    प्रहार         2127राजेश मिश्रा              अपक्ष        2653

काँग्रेसचे साजीदखान पठाण 1283 मतांनी विजयी झाले आहेत.

2019 ची स्थिती काय?

गोवर्धन शर्मा – भाजप – 73 हजार 262 मतेसाजिद खान – काँग्रेस – 70 हजार 669 मतेगोवर्धन शर्मा यांचा 3 हजार मतांनी विजय झाला.