Praful Patel on Ajit Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघातून (Baramati Assembly Constituency) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 100 टक्के भरघोस मतांनी जिंकतील असा विश्वास प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला आहे. पवार कुटुंबाचा मी सदस्य आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बसेल असा विश्वास देखील व्यक्त केला.


आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीकरिता मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आपल्या  जिल्ह्यात गोंदिया येथील एन एम डी कॉलेज येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला. मी पवार कुटुंबीयांचा सदस्य आहे. पवार साहेबांच्या काळापासून माझे चांगले संबंध आहेत. आमचे नेते अजित पवार 100 टक्के भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युग्रेंद्र पवार निवडणूक लढवत आहे. 


बारामती विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष


बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आपल्या पुतण्याला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती, त्यानंतर आता शरद पवारांनी बारामतीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागलं आहे. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी या जागेवर भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा विक्रमी 1,65,265 मतांनी पराभव केला होता.आता अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत. अशा स्थितीत किमान आपला आधीचा विक्रम कायम राखण्याचा दबाव त्यांच्यावर असणार आहे. अशातच लोकसभेप्रमाणे विधानसभा देखील चुरशीची ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा, युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर, अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांवर संतापल्या