Aditya Thackeray on Narayan Rane : आमच्या वर टीका करण्यासाठी गेली 10 वर्ष पगार घेणारी बटली गँग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते. येत्या 23 तारखेला यांचा माज उतवणार असल्याचे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) भाजप खासदार नारायण राणेंवर (Narayan Rane) टीका केली. कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादिवर झोपणार, असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला. हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार आहेत. आपल्यात वाद निर्माण करुन बटेंगे तो कटेगे नारा देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे माणगावमध्ये आले होते, त्यावेळी बोलत होते.
उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये न्याल
गेल्या दोन महिन्यात एक फसवी योजना आणली आहे. लाडकी बहीण योजना. त्यांची घोषणा होती 15 लाख रुपे देण्याची पण त्यांनी 2024 ला 1500 देतायेत, ते निर्लज्ज लोकं आहेत असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली. झाशीत एवढी दुर्घटना घडली तरी त्यांनी आपला एकही कार्यक्रम रद्द केला नाही.उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये न्याल, त्यामुळे परिवर्तन करावं लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर देखीवल त्यांनी टीका केली. महाडिक आमचं सरकार येतंय, आम्ही बघा तुमचं काय करतो ते असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
वैभव नाईक निवडून येणार, सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार
येणारी निवडून आपल्याला साधी सोपी वाटली, तरी सोपी नाही. वैभव नाईक निवडून येणार, सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. वैभव नाईक यांच्यावर धमक्या, दबाव होता असेही आदित्य ठाकरे म्हणाले. गेल्या दोन वर्षांत आपली लढाई सुरू आहे, दोन वर्षात पक्ष नेला, आजोबांचे फोटो चोरल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. गुजरातमध्ये मोदींनी रोड शो काढला, कारण महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये नेले. उध्दव ठाकरे यांच्यावर उद्योगपतीचा विश्वास आहे, आता सरकार पुन्हा आलं की उद्योग राज्यात येतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राणेंच्या मनात एवढा राग का?
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा घोटाळा का केला? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराजांबद्दल यांच्या मनात द्वेष का? असेही ते म्हणाले. आज आजोबांची पुण्यतिथी आहे. आज राणेंनी जे दुःख दिलं, आमच्यावर अतिशय वाईट टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मनात एवढा राग का? राणेंच्या मेडिकल कॉलेजला एका मिनिटात सही केली. आमच्या कठीण काळात काँगेस आणि राहुल गांधी आमच्या सोबत उभे आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.