Maha Vikas Aghadi Manifesto : महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे, आम्ही लाडकी बहिण सुरु केली त्यावेळी आमची टिंगल केली. मात्र, आता आमचीच योजना यांनी काॅपी केल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. आज मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा (Maha Vikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महाराष्ट्राचा जाहीरनामा समोर आज ठेवत आहे. पाच गॅरेंटी यापूर्वीच जाहीर केल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात अधी आहे त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. दलबदलूंसाठी महत्वाची नाही. यांना सत्तेतून हटवलं तर चांगलं सरकार देता येईल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
मविआच्या जाहीरनाम्यातून पाच मोठ्या घोषणा
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात (Maha Vikas Aghadi Manifesto) लाडकी बहिण योजनेतून महिलांना 3 हजार मानधन तसेच सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार मासिक मानधन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती, शेतमालाला हमीभाव देणार, पीकविम्याच्या जाचक अटी काढणार अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती, बार्टी,महाज्योती, सारथीमार्फत शिष्यवृत्ती वाढवणार, एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार, महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार आदी महत्वपूर्ण घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आल्या आहेत.
जाहीरनाम्यात 25 लाखांचा विमा संरक्षण
खरगे यांनी सांगितले की, जाहीरनाम्यात 25 लाखांचा विमा संरक्षण आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांनी ही योजना सुरु केली होती. आम्ही कोणाला काॅपी केलेलं नाही, राजस्थानमध्ये आम्ही चिरंजीवी योजना आणली होती. तीच योजना आम्ही या ठिकाणी लागू करत आहे. जातीय जणगणनना करण्याचा आम्ही निर्णय घेतला असून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार असल्याचे ते म्हणाले. तेलंगणामध्ये जाती जणगणना सुरु झाली. यासाठी 80 हजार स्वयंसेवक काम करत आहेत. आम्ही विभागणी करण्यासाठी करत नाही, तर त्यांच्याकडे काय आहे त्यांना काय सवलत दिली पाहिजे या संदर्भात करत आहे. मात्र, मोदी म्हणतात की काँग्रेस जाती जातीत भांडण लावत आहे, अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या