Maha Vikas Aghadi Conflict: विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aaghadi) तणातणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आणि काँग्रेसमध्ये (Congress) जागावाटपावरुन बिनसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ही धुसफूस सुरू असतानाच दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जागावाटपावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही, असं दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. मविआत जागावाटपावरुन तिढा कायम आहे. एकीकडे संजय राऊतांनी सांगितलंय की, केवळ दोन-तीन जागांवर मतभेद आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील जवळपास 12 जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा कायम आहे. तसेच, काही मुंबईतील जागांसाठीही ठाकरे गट आणि काँग्रेस आग्रही आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली काँग्रेस झुकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. ज्याप्रकारे लोकसभेत सामंजस्याची भूमिका घेतली, आघाडी धर्म पाळला आपण, कमी जागा घेतल्या, पण यंदा लोकसभेचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर ज्या जागांवरती आपला कँडिडेट 100 टक्के निवडून येऊ शकतो, जिथं मुस्लिम वोटर्स खूप जास्त आहेत, अशा जागा आपण सोडायच्या नाही, असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. 


ज्या जागांसाठी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे, अशाच जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेसनं स्पष्ट भूमिका घेतली असून दबावतंत्राखाली यावेळेस झुकायचं नाही. लोकसभेला आपण माघार घेतली मात्र यंदा आपल्या सोबत जनता आहे किंवा महाविकास आघाडीसोबत जनता आहे. प्रामुख्यानं काँग्रेसला जास्तत जास्त जागा मिळाव्यात हा प्रयत्न आपण करतोय आणि त्या निश्चित मिळवून घेऊ, अशा प्रकारच पवित्राही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर शिवसेना ठाकरे गट काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हरियाणा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा... 


काही दिवस मागे जाऊन पाहिलं तर, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी दिल्ली वारी केली होती. तिथं मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली होती. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती. तब्बल तीन दिवस ते दिल्लीत होते. त्यावेळी सर्वांसमोर हम साथ साथ है... अशा स्वरुपाचं चित्र निर्माण झालं होतं. त्यापूर्वीही ठाकरे गटानं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं सांगितलं होतं. पण काही काळातच तो सूर मावळला. त्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणूक पार पडली. तेव्हापासूनच शिवसेनेनं आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळेच राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्ली दौरा करावा लागला. कारण ज्या गोष्टींवरती एकमत झालं होतं, काही जागांवरती


महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना सोबत राहायचं आहे, पण बार्गेन पावर वाढवून राहायचं आहे. म्हणूनच काँग्रेसनं आपल्या नेत्यांना स्पष्ट केलेलं आहे की, ज्या जागांवर तिढा कायम आहे, त्याची चर्चा ही लांबणार... शेवटपर्यंत जाऊ शकते. म्हणून त्याची तयारी ठेवा म्हणजे, काँग्रेस याबद्दल स्पष्ट आहे की, आपण या जागांवर दावा केला पाहिजे. आपण चर्चा करू, लांबणीवर गेलं तरी चालेल.. तशीच भूमिका शिवसेनेची पण आहे. प्रामुख्यान शिवसेनेलाही आघाडीत राहायचं आहे, पण शिवसेनेला जसं भाजपसोबत असताना एक मोठा भाऊ म्हणून शिवसेना राज्यात सरकारमध्ये राहिली किंवा युतीमध्ये राहिली तसंच महाविकास आघाडी मध्ये शिवसेना लोकसभेमध्ये मोठा भाऊ म्हणून राहू शकली, पण परफॉर्मन्स पाहता विधानसभेला तशी स्थिती नाहीये. 


उद्धव ठाकरे आक्रमक, पण दुसरीकडे आदित्य ठाकरेंची मवाळ भूमिका 


पण दुसऱ्या बाजूला संजय राऊत, उद्धव ठाकरे आक्रमकपणे बोलतायत... पण आता कुठेतरी आदित्य ठाकरे यांनी एक थोडी मवाळ भूमिका घेतली आहे. ते असं म्हणालेत की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्त्वाचा आहे. आघाडी टिकवण महत्त्वाच आहे म्हणून एका बाजूला एक नेता आक्रमक आहे, तर दुसऱ्या बाजूला दुसरा नेता कुठेतरी सामंजस्य किंवा शांत करण्याच्या भूमिकेत असतो. कारण, एकएक जागा निवडून आणणं महत्त्वाचं आहे. आता नेमकं काय होणार? कोण आपला दावा सोडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पाहा व्हिडीओ : Congress MVA Vidhan Sabha : लोकसभेतील कामगिरीनंतर काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही