MP Exit Poll Results 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Madhya Pradesh Assembly Election 2023) निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेसची (Congress) सत्ता येणार की भाजप (BJP) पुन्हा सत्तेत येणार? हे या दिवशी कळेल. एबीपी न्यूज सीव्होटरच्या एक्झिट पोलमध्ये (ABP Cvoter Exit Poll) याबाबतचं चित्र समोर आलं आहे. या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार बनू शकतं. मात्र, यावेळी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचा फायदा भाजपला झाला की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य प्रदेशात भाजपचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर (Gwalior) चंबळमध्ये भाजपची पिछेहाट होताना दिसत आहे. एबीपी न्यूज CVoter च्या एक्झिट पोलनुसार, चंबळ प्रदेशातील 34 जागांपैकी काँग्रेसला 26 ते 30 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ चार ते आठ जागाच मिळू शकतात.
मध्य प्रदेशचा EXIT POLL
स्रोत : सी व्होटर
रीजन : चंबल
जागा : 34
काँग्रेस : 47 टक्के
भाजप : 37 टक्के
इतर : 16 टक्के
रीजन : चंबल
सीट : 34
काँग्रेस : 26-30
भाजप : 4-8
इतर : 0-2
कोणत्या पक्षाला किती जागा?
मध्य प्रदेशातील एक्झिट पोलनुसार, यावेळी काँग्रेस राज्यात सत्तेच्या शिखरावर पोहोचू शकते. शिवराज सरकारला निरोप मिळू शकतो. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, जर आपण मध्य प्रदेशातील 230 जागांबाबत बोललो तर 113 पैकी 137 जागा काँग्रेसच्या वाट्याला जाऊ शकतात, तर उर्वरित 88 ते 112 जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात. इतर पक्षांना दोन ते आठ जागा मिळू शकतात.
2018 प्रमाणेच यंदा मध्य प्रदेशमध्ये 'ऑपरेशन लोटस' प्रभावी ठरणार? (Operation Lotus)
ऑपरेशन लोटसचा यशस्वी प्रयोग करत 2018 साली निवडणुकीत गेलेली सत्ता ही मागच्या दरवाजाने भाजपनं मिळवली. त्यानंतर कमलनाथ यांना हटवून परत एकदा शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केलं. मात्र या निवडणुकीत भाजपला केंद्रातून आपले मंत्री राज्यात पाठवून, निवडणूक लढवावी लागली. प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणाऱ्या भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही. तिकीटाची घोषणा होतानासुद्धा शिवराज सिंह चौहान यांना देव पाण्यात घालून बसावं लागलं होतं. भाजपनं अपेक्षेप्रमाणे आपला प्रचार हिंदू मतांभोवतीच सुरु केला. सरकार आलं तर अयोध्येतील राम मंदिरांचं मोफत दर्शनाची सोय करु अशी घोषणा अमित शाहांनी केली.
2018 च्या निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कुणाला?
मध्यप्रदेशात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत निवडणूक निकाल स्पष्ट झालेले नव्हते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार? याचं चित्र अगदी उशीरापर्यंतही अस्पष्ट होतं. अंतिम निकाल हाती आला, गेल्या निवडणुकीत भाजप मतांच्या संख्येत तर काँग्रेस जागांच्या बाबतीत पुढे होती. त्यावेळी मध्य प्रदेशात 75.2 टक्के मतदान झालं होतं. त्यापैकी भाजपला 41.6 टक्के मतं मिळाली होती, तर 230 पैकी 109 जागा जिंकल्या होत्या.
गेल्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्षाला 41.5 टक्के मतं मिळाली. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 116 जागांपेक्षा दोन जागा कमी म्हणजेच, काँग्रेसचा आकडा 114 वर येऊन थांबला होता. मतांच्या टक्केवारीत भाजप पक्ष एक टक्क्यानं पुढे होता, तर जागांच्या बाबतीत काँग्रेसला आणखी पाच जागा जिंकण्यात यश आलं आहे. बहुजन समाज पक्षानं (BSP) 5.1 टक्के मतांसह दोन जागा जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला 1.3 टक्के मतांसह एक जागा जिंकण्यात यश आलं होतं. त्यावेळी 5.9 टक्के मतं अपक्षांना गेली आणि चार अपक्ष विधानसभेत पोहोचले होते.
नोट : मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (Mizoram) यापूर्वीच मतदान झालं आहे. तेलंगणातही काल (30 नोव्हेंबर 2023) मतदान पार पडलं. अशा परिस्थितीत सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक्झिट पोल केला आहे. प्रत्येक जागेवर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. ज्यामध्ये एकूण 1 लाख 11 हजारांहून अधिक मतदारांशी बोलणं झालं. प्रत्येक राज्यात मतदान झाल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला तेलंगणात किती जागा मिळतील? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज