Bacchu Kadu on loksabha election : रवी राणा (Ravi Rana) 3 वर्ष चूप बसला असता तर कदाचित नवनीत राणांचा (Navneet Rana) विजय झाला असता असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं. धर्म आणि जाती न पाहता न्याय आणि अन्याय पाहून लोकांनी मतदान केल्याचे कडू म्हणाले. पैसा आणि सत्ता म्हणजे सर्व काही नाही. न्यायालय देखील नवनीत राणांच्या बाजूने उभ राहिलं. न्यायालयावर दडपशाही केल्याची टीका बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केली. ते रायगडध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पैसा आणि सत्ता म्हणजे सर्व काही नाही. पैसा सत्ता तुमच्याकडे असला तरी लोकांनी हे सर्व हाणून पाडल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. आमच्या नावावर वैर नाही तर कृतीवर वैर असल्याचे कडू म्हणाले.
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचे परिणाम
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचे परिणाम जास्त जाणीवपूर्वक दिसला आहे. या भागात एका नावाच्या व्यक्तीचा परिणाम पंकजा मुंडेंवर झाल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. या मतदारसंघात मतभेद निर्माण झाल्याचे परिणाम आहेत. जातीभेद धर्म आणि जातीवर राजकरण झाले आहे. जातीवर मत मागणारा मी नाही. काम पाहून मतदान मागणारा मी असल्याचे कडू म्हणाले. कामाच्या नावावर मतदान मगणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे बच्चू कडू म्हणाले.
अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत झाली
अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि झालंही तसंच. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. त्यातच शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. परिणामी या निवडणुकीत नवनीत राणांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
महत्वाच्या बातम्या: