पुणे : पुण्यातील स्त्रीमुक्ती संपर्क समितीने महिलांच्या मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये समाजातील विविध घटकांतील महिलांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताचा विचार करुन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. महिलांचं आरोग्य, शिक्षण, संपत्तीचे अधिकार, आर्थिक स्वावलंबन यासाठीचे कायदे यासंबंधीच्या विस्तृत मुद्द्यांचा यामध्ये समावेश केला आहे.


राजकीय पक्षांनी या मुद्द्यांचा विचार करुन जाहीरनामा तयार करावा, अशी अपेक्षा स्त्रीमुक्ती समितीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महिलांनीही आपल्या समस्या नीट समजून घेऊन योग्य त्या उमेदवारालाच मतदान करावं, असं आवाहनही केलं आहे.



लोकशाहीत महिलांचं स्थान बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांचा समावेश आवश्यक आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदार महिलांनी बाहेर पडून मतदान करावं, असं आवाहनही स्त्रीमुक्ती संपर्क समितीने केलं आहे. यासंदर्भातील जनजागृतीसाठी 4 तारखेला देशभर महिला संघटनांतर्फे रॅली काढण्यात येणार आहे.