Raver Lok Sabha Election Result 2024 :  गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आघाडीवर आहेत. रक्षा खडसे यांना 2 लाख 94 हजार 035 मते मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना 1, लाख 73 हजार 906 मिळाले आहेत. तर मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी व्हीईएम मशीनवर (EVM Machine) आक्षेप घेतला होता. यावरुन महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 


श्रीराम पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाची (Raver Lok Sabha Constituency) मतमोजणी थांबवली होती. ईव्हीएम मशीनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग असल्याचा श्रीराम पाटील यांनी आक्षेप घेतला होता. मतदान झाले होते तर चार्जिंग का संपली नाही. चार्जिंग असलेल्या मशीनमध्ये कमळाला मतदान होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


रक्षा खडसे यांचा श्रीराम पाटील यांच्यावर पलटवार 


यावरून रक्षा खडसे म्हणाल्या की, श्रीराम पाटलांकडे मुद्दे नाही त्यांना कळतंय की रावेरची जागा त्यांच्या हातून जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शोधून ते हरकत घेत आहे. प्रशासन नियमाच्या बाहेर काम करत नाही. रावेर लोकसभेसाठी पुन्हा रिकॉउंटिंग सुरू झाली आहे. रावेर लोकसभा व जळगाव लोकसभेत दोघेही महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. निवडून आणणे जनतेच्या हातात असतं. दहा वर्षात खासदार म्हणून केलेल्या कामावर जनता मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यांनी निवडून देईल. समोरच्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार केला आहे. एक महिला म्हणून मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बऱ्याच ठिकाणी जागा मागे पुढे होताना दिसताय. 100 टक्के काउंटिंग झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. अजूनही मला विश्वास आहे की महायुतीच्या जागा जास्तीत जास्त महाराष्ट्रात निवडून येईल, असे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


जनतेनं दाखवला इंगा, पराभूत झाला आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा; कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराने मारली बाजी


वंचितला मतदारांनी नाकारले; पुणे, बीड, धाराशिव, परभणी अन् अकोल्यातून कुणाला किती मतं?