Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काटे की टक्कर होत आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरमधून आघाडी घेतली आहे. तर निलेश लंके हे पिछाडीवर आहेत. 

Continues below advertisement

अहमदनगरमधून सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी अखेर 3613 मतांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत सुजय विखे यांना 25653 एवढी मतं मिळाली. तर निलेश लंके यांना  22040 एवढी मतं मिळाली. तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर आहेत. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे आघाडीवर

नाशिक लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ भाऊ वाजे यांना 1 लाख 15 हजार 709 मते मिळाली आहे.

Continues below advertisement

हेमंत गोडसे 79 हजार 369

36 हजार 340 मतांनी राजाभाऊ वाजे आघाडीवर

रावेर लोकसभा मतदारसंघ 

रावेर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे  यांना 99 हजार 555 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना 73 हजार 223 मते मिळाली. 26 हजार 332 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर आहेत. 

आणखी वाचा 

Lok Sabha Result 2024: भाजपला सर्वात मोठा धक्का; पहिल्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी 30 जागांवर आघाडीवर