Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election)  पाचव्या टप्प्यातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 49 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा घटता कल कायम राहिला आहे.  महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. मात्र या टप्प्यात 13 मतदारसंघातली मतदानाची टक्केवारी अतिशय निराशाजनक राहिलीय. राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झालंय. तर देशात 60.09 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगालमध्ये  76.05 तर महाराष्ट्रात सर्वात कमी 54.33 टक्के झाली आहे.


महाराष्ट्रातील   सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालं तर सर्वात कमी मतदान कल्याण लोकसभा मतदारसंघात झालं. दिंडोरीत 62.65 टक्के   मतदान झालं. दिवसभर असलेली उष्णता, मतदार याद्यातले घोळ यामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं बोललं जातंय. विविध पक्षांकडून आणि नेत्यांकडून वारंवार आवाहन करूनही प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदाराला आणण्यात अपयशच आणल्याचं दिसलं.  


दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक मतदान


लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मिळून  54.33 टक्के मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 62.65 टक्के मतदान झालं. तर सर्वात कमी   मुंबईतल्या सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर मतदारसंघांमध्ये मतदान झालं.


देशाची रात्री 11 पर्यंतची आकडेवारी 



  • बिहार - 54.85

  • जम्मू कश्मीर - 58.17

  • झारखंड – 63.09 

  • लडाख - 69.62

  • महाराष्ट्र - 54.33 

  • ओडिशा - 69.34 

  • उत्तर प्रदेश - 57.79 

  • प. बंगाल - 76.05


2019 आणि 2024 च्या आकडेवारीवर नजर मारल्यास महाराष्ट्रात 2019 साली 55.67 टक्के मतदान झाले होते. यंदा 54.33 टक्के मतदान झाले आहे.  


राज्यातील  आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी



  • दक्षिण मुंबई - 47.70

  • दक्षिण मध्य मुंबई - 51.88

  • उत्तर मध्य मुंबई - 51.42

  • उत्तर मुंबई - 55.21

  • ईशान्य मुंबई - 53.75

  • वायव्य मुंबई  - 53.67

  • ठाणे - 49.81

  • कल्याण - 47.08

  • भिवंडी - 56.41

  • पालघर -61.65

  •  दिंडोरी - 62.66

  • धुळे- 56.61

  • नाशिक - 57.10


दिंडोरी लोकसभा साठी 62.65 टक्के मतदानाचा अंदाज आहे.  आत्ताच्या आकडेवारी नुसार टक्केवारी घसरली. मागील निवडणुकीत 65.65 टक्के  मतदान झाले होते. 


मुंबईत मतदानात ढिसाळ कारभार, मतदारांमध्ये तीव्र नाराजी


लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातले मतदानाचे पाचही टप्पे पार पडले. मात्र अखेरचा म्हणजे पाचव्या टप्प्यात मुंबई आणि एमएमआरमधील मतदानात ढिसाळ कारभाराचा अनुभव आला. ढिसाळ नियोजनामुळे अनेक मतदान केंद्रांवर संथगतीने मतदान सुरू होतं. मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपून गेल्यावरही रांगा होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी, संताप आणि गोंधळाचं वातावरण आहे. मुंबईतील विलेपार्ले, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील बिंबीसारनगर, बोरिवली, दहिसरसह अनेक भागात मतदानाला विलंब झाल्याची तक्रार मतदारांनी केलीय. निवडणूक आयोगाच्या बूथ नियोजनावर मतदार संतप्त झालेत. मतदानाला विलंब होत असल्याने काही जण मतदान न करताच निघून गेले. तर काहींनी तास तास उभं राहून मतदान केलं. आयोगाच्या ढिसाळ नियोजनावर मतदारांनी संताप व्यक्त केलाय. 


 हे ही वाचा :


Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप