नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेला सर्व्हे अचूक होता. यंदाच्या निवडणुकीदरम्यान योगेंद्र यादवांच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. यामध्ये म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत योगेंद्र यादव यांनी केलेल्या सर्व्हेनुसार भारतीय जनता पक्षाला 146 जागा मिळतील तर काँग्रेसला 137 जागा मिळतील. परंतु हा मेसेज आणि सर्व्हे दोन्ही चुकीचे आहेत.


व्हायरल झालेल्या या मेसेजनंतर योगेंद्र यादवांनी सर्व्हे करण्याचे ठरवले. योगेंद्र यादव यांनी सरकार स्थापनेबाबतच्या पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यादवांच्या सर्व्हेनुसार भाजप आणि युतीतले पक्ष (मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए)सरकार स्थापन करतील. अशा प्रकारचे सरकार स्थापन करण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येण्याचीदेखील शक्यता आहे. तसेच एनडीएला (भाजप आणि मित्रपक्ष)बहुमताच्या जवळ पोहोचता येईल, परंतु पूर्ण बहुमत नाही मिळालं तर इतर (अपक्ष आणि लहान-मोठे पक्ष)पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचीदेखील शक्यता आहे.

एनडीएला बहुमतापेक्षा खूप कमी जागा मिळणे आणि एनडीएव्यतिरिक्त पक्षांचा पाठिंबा घेऊन मोदीवगळता नेता (भाजपमधील नेता अथवा इतर पक्षातील नेता)भारताचा पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. तसेच युपीए (काँग्रेस आणि मित्रपक्ष) आणि महाआघाडी मिळून सत्ता स्थापन करणे अशक्यच असल्याचे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.