Political News | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कुणा-कुणाच्या सभा?
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्षांची जिग्गज मंडळी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या दिवसभरात आज तीन सभा होणार आहेत. नंदुरबार येथील नवापूरमध्य़े एक सभा होणार आहे. तर अकोले आणि कर्जत येथेही शाहांच्या सभा होणार आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो होणार आहे. तर नागपूर येथील पाटनसावंगी येथे प्रचारसभा होणार आहे. नंतर चंद्रपूरमधील भिसी आणि भंडारा येथेही मुख्यंत्र्यांची सभा होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यांही दिवसभरात पाच सभांचं आज आयोजन करण्यात आलं आहे. साताऱ्यातील माण येथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. नंतर रायगडमधील माणगाव, श्रीवर्धन, उरण, कर्जत येथे प्रचारसभा होणार आहेत.
दरम्यान आत्तापर्यंत भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी प्रचारसभा घेतल्या. तर काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र, पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाधिक सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावरच या नवीन पक्षाच्या प्रचाराची धुरा होती. मनसेच्या वतीने एकमेव राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या. बहुतांश नेत्यांच्या सभांचा घडाका शुक्रवारीच संपला आहे.