नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरु आहे. कुमार विश्वास पूर्व दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात.
भाजप दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (1 एप्रिल) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली होती, तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. कुमार विश्वास पूर्व दिल्ली मतदारसंघातून आपच्या उमेदवार आतिशी यांच्याविरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यात सोमवारी रात्री सुमारे एक तास बातचीत झाली. त्यानंतर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघासाठी कुमार विश्वास यांच्या नावाची शिफारस केली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. दिल्ली भाजप प्रदेश युनिटने दिल्लीच्या लोकसभा जागेसाठी आधीच अनेक नावांची शिफारस केली आहे. भाजप 5 एप्रिल रोजी दिल्लीच्या सात मतदारसंघातीन उमेदवारांची घोषणा करणार असल्याचा अंदाज आहे.
दिल्ली पू्र्व मतदारसंघात भाजपचे महेश गिरी विद्यमान खासदार आहेत. त्यांना गुजरातच्या जुनागडचं तिकीट दिलं जाऊ शकतं. इथे ते एका पिठाचे प्रमुख होते. मनोज तिवारी आणि कुमार विश्वास याआधी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंधं समोर आले होते. एवढंच नाही तर मनोज तिवारी यांनी आपल्याला पक्षात सामील होण्याची ऑफरही दिल्याचं कुमार विश्वास यांनी सांगितलं.
कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2019 11:30 AM (IST)
मनोज तिवारी आणि कुमार विश्वास याआधी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंधं समोर आले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -