एक्स्प्लोर

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षकच्या लढाईत कोल्हापूर रणभूमी होणार! दोन्ही उमेदवार कोल्हापुरातील फायनल झाल्याने चुरस वाढली, सीजेपी आंदोलनानंतर काँग्रेस महायुतीमध्ये थेट लढत

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.   

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमध्ये उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार यावरून काथ्याकूट सुरू असतानाच अखेर भाजपनेच बाजी मारली आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाटणीला आला आहे. भाजपकडून कोल्हापूरमधील स्वामी विवेकानंद संस्थेचे संचालक कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुणे शिक्षक लढाई आता कोल्हापूरमध्येच होणार आहे, कारण काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.   

महायुतीत कोणाला कोणता मतदारसंघ

  • पुणे शिक्षक : भारतीय जनता पक्ष (BJP)
  • पुणे पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
  • नागपूर पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
  • अमरावती : शिवसेना (शिंदे गट)
  • छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

या मतदारसंघातूनच गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीचा तिढा चांगलाच रंगला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू केली होती आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असंही त्यांच्या समर्थकांकडून बोललं जात होतं. दुसरीकडे शिंदे गटामधीलच उदय सामंत यांचे निकटवर्तीय माजी ओएसडी सचिन सानप हे सुद्धा पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहेत. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाला सुटणार याकडे लक्ष होतं. मात्र स्वामी विवेकानंद संस्थेच्या कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली आहे. ते चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.   

दुसरीकडे सचिन सानप यांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारी निश्चितीनंतरही 'आपण निवडणूक लढवणार' असल्याचं म्हटलं आहे. 'पक्ष नसेल तर ठीक, अपक्ष म्हणून ही लढाई लढणार' असल्याचंही सानप यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बंडखोरी होणार का, याकडे सुद्धा लक्ष असेल. सचिन सानप हे पुण्यातील वाडिया कॉलेजचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यामुळे ही डोकेदुखी महायुतीसाठी सोडवावी लागणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रचार सुरू असल्याने आता या निवडणुकीमध्ये कोल्हापूर हीच पुण्यासाठी रणभूमी असणार आहे. दुसरीकडे, कोल्हापुरातूनच हसन मुश्रीफ यांचे अत्यंत निकटवर्तीय भय्या माने यांची पदवीधर मतदारसंघासाठी तयारी सुरू होती, मात्र त्यामुळे त्यांनी सुद्धा बंडाचा पवित्रा घेतला आहे. 'कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणारच' असं भय्या माने यांनी जाहीर केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
Pune Teacher Constituency: 'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
सभासदांना सावध करा भाजप इथं आलंय, पण लोक म्हणतायेत पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, युगेंद्र पवाराचं वक्तव्य, सुनेत्रा पवारासंह पुरुषोत्तम जगतापांना लगावला टोला
सभासदांना सावध करा भाजप इथं आलंय, पण लोक म्हणतायेत पवार साहेबांशिवाय पर्याय नाही, युगेंद्र पवाराचं वक्तव्य, सुनेत्रा पवारासंह पुरुषोत्तम जगतापांना लगावला टोला
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथ शिंदे साहेबांनी..
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथजी शिंदे साहेबांनी..
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget