Kolhapur Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 10 जागा या महायुतीच्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात माजी मंत्री सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजप खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर उत्तरचे नुतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांवर जोरदार टीका केली आहे.
कोल्हापूरवर भगवा फडकून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले : राजेश क्षीरसागर
शाहू महाराज यांचा दम काढणाऱ्या सतेज पाटील यांचा कोल्हापूरच्या जनतेने दम काढला आहे, अशी टीका कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. कोल्हापूरवर भगवा फडकून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महायुतीने कोल्हापुरात प्रचाराचा शुभारंभ केला. आता विजयी सभाही कोल्हापुरात होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलीय. विजयाबद्दल त्यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानताना छत्रपतींचा दम काढणाऱ्या सतेज पाटील यांचा जनतेने दम काढला म्हणत पाटलांवर यांच्यावर निशाण साधला आहे.
धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
स्वतःच्या घरातील व्यक्तीला म्हणजे पुतण्याला निवडून आणता आले नाही आणि हे मुख्यमंत्री बनायला निघाले होते, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली. मी महिनाभरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात महायुती 10 जागांवर निवडून येतील असं बोललो होतो. खालच्या पातळीवर जाऊन सतेज पाटील यांनी टीका केली. सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यावर खालच्या पातळीवर टीका केली. हे कोल्हापूरच्या जनतेला आवडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीय.
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची यादी
1. कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील
2. कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
3. करवीर - चंद्रदीप नरके
4. हातकणंगले - अशोकराव माने
5. इचलकरंजी - राहुल आवाडे
6. शिरोळ - राजेंद्र पाटील यड्रावकर
7. शाहूवाडी- पन्हाळा - विनय कोरे
8. कागल - हसन मुश्रीफ
9. चंदगड - शिवाजी पाटील
10. राधानगरी भुदरगड - प्रकाश आबिटकर
इतर महत्त्वाच्या बातम्या