Kishori Pednekar on BJP Manifesto मुंबई : भाजपचे मला 10 कुत्री माहित आहे जे ते म्हणतात १० सूत्री. कालचं धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) सांगितलं 1500 रुपये देतोय महिला तिकडे जात आहेत का, त्यांचा बंदोबस्त करतो, म्हणजे काय करणार, सरकारकडून पैसे दिले जात असताना महिला स्वत:च्या मालकीच्या असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. याचं म्हणजे योजना एक, बाप तीन अशी परिस्थिती आहेत. दावे भाजप हजार करतील, मात्र घालवलेल्या कंपन्या परत आणा, नोकऱ्या देणार पण कुठे महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप आणि सरकारवर बोचरी टीका केली आहे. म्हटलं आहे.
महायुती फक्त हमी देतेय, देत काहीही नाही- किशोरी पेडणेकर
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या संकल्पपत्रात भाजपकडून अनेक घोषणांचा जणू पाऊसच पाडला आहे.
दरम्यान मविआने देखील आज आपला महाराष्ट्रनामा जाहीर करत अनेक आश्वासन दिले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. दरम्यान आज याच मुद्यावरून किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी भाजप आणि सरकारवर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्राला यांनी कर्जाच्या खाईत ढकललं आहे. हे फक्त हमी देतात, देत काही नाही. मात्र दहा हातानी काढून घेत आहेत अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काय काय?
- महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 3 हजार रुपये देणार
- महिलांना बस प्रवास मोफत करणार
- स्वयंपाकाचे हा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयांत उपलब्ध करुन देणार
- महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी निर्भय महाराष्ट्र धोरण आखणार
- त्याचप्रमाणे शक्ती कायद्याची देखील अंमलबजावणी करणार
- 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुख कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) प्रतिबंधक लस मोफत देणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांत दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
- बचत गट सक्षमीकरणसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार
- स्वतंत्र बाल कल्याण मंत्रालय स्थापन करणार
- जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नाव ठरावीक रक्कम बँकेत ठेवून तिने अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर तिला एक लाख रुपये देणार
हे ही वाचा