Kerala Election Result 2026: देशातील डाव्या विचारांचा शेवटचा गड मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये (Kerala Election Result 2026) आज ऐतिहासिक सत्तांतर होताना दिसत आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) ने स्पष्ट बहुमत ओलांडले असून, डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) ला मोठा धक्का बसला आहे.

Kerala Election Result 2026: विजयन यांचा बालेकिल्ला धोक्यात

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे केरळचे विद्यमान मुख्यमंत्री आणि डाव्यांचे दिग्गज नेते पिनराई विजयन हे त्यांच्या हक्काच्या 'धर्मादोम' मतदारसंघात पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार व्ही. पी. अब्दुल रशीद यांनी येथे मोठी आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Kerala Election Result 2026: पक्षनिहाय बलाबल (एकूण 140 जागा):

काँग्रेस आघाडी (UDF): 96 जागांवर आघाडी (बहुमतासाठी 71 आवश्यक)

डावी आघाडी (LDF): 42 जागांवर आघाडी

भाजपा (NDA): 02 जागांवर आघाडी

इतर: 00

Kerala Election Result 2026: शशी थरूर यांचे सूचक विधान

विजयाचा कल स्पष्ट होताच तिरुवनंतपुरम येथील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. यावेळी खासदार शशी थरूर म्हणाले की, "आता वेळ केवळ सत्ता बदलण्याची नाही, तर धोरण बदलण्याची आणि केरळच्या पुनरुज्जीवनाची आहे. केरळची आर्थिक स्थिती सुधारणे आणि तरुणांचे स्थलांतर रोखून येथे गुंतवणुकीचे केंद्र बनवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल," असे त्यांनी सांगितले. 

Kerala Election Result 2026: मुख्यमंत्रीपदासाठी हे चेहरे चर्चेत

काँग्रेसला मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर आता मुख्यमंत्री कोणाला करायचे, यावर मंथन सुरू झाले आहे. सध्या पाच प्रमुख नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

1. के. सी. वेणुगोपाल 

2. व्ही. डी. सतीशन 

3. शशी थरूर 

4. चांडी ओमान (माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचा मुलगा)

5. रमेश चेन्निथला 

Kerala Election Result 2026: डावेमुक्त भारताकडे वाटचाल?

केरळ हे एकमेव राज्य होते जिथे डाव्यांची सत्ता होती. मात्र, आजच्या निकालांनी डाव्या पक्षांसमोर अस्तित्वाचे संकट उभे केले आहे. "भारत काँग्रेसमुक्त झाला नाही, पण आता तो डावेमुक्त होण्याच्या मार्गावर आहे," अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Tamil Nadu Election Result 2026: महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूतही ‘लाडक्या बहिणी’चा करिष्मा, थलपती विजयच्या ‘या’ 7 प्रभावी घोषणांनी फिरवलं राजकारण, द्रमुकचा सुपडा साफ?