Kalyan-Dombivli mahanagarpalika election 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 19 ‘ब’ मधील घटना चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात भाजपच्या उमेदवार डॉ. सुनिता पाटील (Sunita Patil) आणि मनसेच्या उमेदवार काजल जयंता पाटील (Kajal Patil) या एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. मात्र नातेसंबंध जपण्यासाठी काजल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. सुनिता पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत.
मनसेच्या उमेदवार काजल पाटील यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, माझ्या आत्या डॉ. सुनिता पाटील यांच्यासमोर मी निवडणूक लढवू नये, हा निर्णय पूर्णतः कौटुंबिक नातेसंबंध जपण्यासाठी घेतला आहे. कोणत्याही प्रकारचे आमिष, दबाव किंवा आर्थिक व्यवहार याला मी बळी पडलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
Kalyan-Dombivli mahanagarpalika election 2026: नातेसंबंध जोपासण्यासाठी अर्ज मागे?
दरम्यान, काजल पाटील यांचे वडील जयंता पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पक्षासाठी एकनिष्ठ कार्यकर्ता नको, तर नातेसंबंध महत्त्वाचे आहेत, असा निर्णय आम्ही घेतला. माझ्या मुलीचा अर्ज केवळ नातेसंबंध जोपासण्यासाठी मागे घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
Kalyan-Dombivli mahanagarpalika election 2026: अर्ज मागे घेण्यामागे दबावतंत्र?
या संपूर्ण प्रकारामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरोखरच केवळ नातेसंबंधांमुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले का? की कुठेतरी दबावतंत्र, राजकीय समजूत किंवा आर्थिक व्यवहार झाले आहेत का, असा संशय सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. महायुतीचे 20 उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही केवळ योगायोगाची बाब आहे की नियोजनबद्ध राजकीय रणनीती, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kalyan-Dombivli mahanagarpalika election 2026: भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण – 14)
1. आसावरी नवरे – प्रभाग क्रमांक 26 (क)
2. रंजना पेणकर – प्रभाग क्रमांक 26 (ब)
3. रेखा चौधरी – प्रभाग क्रमांक 18 (अ)
4. मंदा पाटील – प्रभाग क्रमांक 27 (अ)
5. विशु पेडणेकर – प्रभाग क्रमांक 26 (अ)
6. साई शेलार – प्रभाग क्रमांक 19 (क)
7. महेश पाटील – प्रभाग क्रमांक 27 (ड)
8. दीपेश म्हात्रे – प्रभाग क्रमांक 23 (अ)
9. हर्षदा भोईर – प्रभाग क्रमांक 23 (क)
10. जयेश म्हात्रे – प्रभाग क्रमांक 23 (ड)
11. डॉ. सुनिता पाटील – प्रभाग क्रमांक 19 (ब)
12. पूजा म्हात्रे – प्रभाग क्रमांक 19 (अ)
13. रविना माळी – प्रभाग क्रमांक 30 (अ)
14. ज्योती पाटील – प्रभाग क्रमांक 24 (ब)
Kalyan-Dombivli mahanagarpalika election 2026: शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण – 6)
डोंबिवली पश्चिम
1 विश्वनाथ राणे – पॅनल क्रमांक 24
2 रमेश सुकऱ्या म्हात्रे – पॅनल क्रमांक 24
3 वृषाली जोशी – पॅनल क्रमांक 24
डोंबिवली पूर्व
4 हर्षल मोरे – पॅनल क्रमांक 28 (अ)
कल्याण पूर्व
5 रेश्मा किरण निचळ – पॅनल क्रमांक 11 (अ)
डोंबिवली
6 ज्योती राजन मराठे – प्रभाग क्रमांक 28 (ब)
आणखी वाचा