सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठीची मतमोजणी सुरु आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे. औंध जिल्हा परिषद गटातील अटीतटीच्या लढतीत  जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे यांचा पराभव झाला आहे. औंध जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्यानं सर्वांचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे यांनी विजय मिळवला आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देसाई यांनी अरुण गोरे यांचा पराभव केला आहे. तर, आंधळी जिल्हा परिषद गटात सोनल गोरे यांचा विजय झाला आहे.  

औंधमध्ये राष्ट्रवादीचा विजय, जयकुमार गोरेंना धक्का 

औंध जिल्हा परिषद गटातून  मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. त्यांना  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे यांनी 40 मतांनी पराभूत केलं. 

आंधळी जिल्हा परिषद गटात सोनल गोरे विजयी

आंधळी जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे निवडणूक लढवली. या जिल्हा परिषद गटात सोनल गोरे आघाडीवर होत्या. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दिपाली जगदाळे यांनी आव्हान उभे केलं होतं. मात्र, आंधळी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे यांनी मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवल्याची माहिती आहे. सोनल गोरे यांनी 18 हजार मतांनी विजय मिळवल्याची माहिती आहे.

कुकुडवाड गटात अनिल देसाईंचा विजय

कुकुडवाड गटात जयकुमार गोरे यांचे चुलत बंधू अरुण गोरे आणि राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांच्यात अटीतटीचा सामना आहे. अनिल देसाई यांनी अरुण गोरे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.   

सातारा जिल्ह्यातील इतर निकाल 

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विजयी उमेदवार यादी

सातारा तालुका गट आणि गण

पाटखळ - शुभांगी जाधव (राष्ट्रवादी)गण पाटखळ - राहुल शिंदे (भाजप)गण शिवथर - राजेश पवार (राष्ट्रवादी)

लिंब - सर्जेराव सावंत (भाजप) गण लिंब - प्रभाकर पवार ( भाजप)गण कोंडवे - महेश गाडे (भाजप)

खेड गट - कामेश कांबळे (राष्ट्रवादी)

गण माहुली - राणी पवार ( राष्ट्रवादी)गण खेड - कोमल गायकवाड (राष्ट्रवादी)

कोडोली गट- नीता खरात  (भाजप)

गण संभाजीनगर - विजया साळुंखे ( भाजप)गण कोडोली -  राहुल कापले ( राष्ट्रवादी)

कारी - राजू भोसले ( भाजप)गण परळी - वसंतराव भंडारे (भाजप)

पाटण तालुका

हेळवाक गट  - अशोक पाटील ( शिवसेना)

कराड तालुका

मसूर गट - लालासो जगदाळे (भाजप)

गण मसूर - संजय घोलप (राष्ट्रवादी श. प)

गण वडोली भि - कोमल यादव (भाजप)

महाबळेश्वर तालुका 

तळदेव गट :अजित सपकाळ विजयी (शिवसेना)

कुंभरोशी गण : संजय मोरे विजयी (शिवसेना)

तळदेव गण: संजय शेलार विजयी (शिवसेना)

भिलार गट: संजय केळगणे विजयी (राष्ट्रवादी) 

मेटगुताड गण : शकुंतला चोरमले विजयी (राष्ट्रवादी)

भिलार गण: वंदना भिलारे विजयी (राष्ट्रवादी)