सांगली : कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली. जत विधानसभा मतदारसंघात भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत यांचा 37,881 मतांनी पराभव केला.  गोपीचंद पडळकर यांना 1,11,906 मतं मिळाली. तर काँग्रेसच्य विक्रमसिंह सावंत यांना 74,025 मतं मिळाली. 

Continues below advertisement

काँग्रेसने विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी भाजपचे बंडखोर तमनगौडा रवीपाटील यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. सांगली जिल्ह्यातील आठपैकी जत विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ होता की ज्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मताधिक्य मिळालं आहे.

गोपीचंद पडळकर हे मूळचे आटपाडी येथील असल्यामुळे जत भाजपमध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात असा संघर्ष बंडखोरीच्या वळणावर पोचला होता. अशाही स्थितीत गोपीचंद पडळकर यांनी बाजी मारली. 

Continues below advertisement

Jat Vidhan Sabha Constituency Result : 2019 सालचा निकाल काय? 

  • विक्रमसिंह सावंत - (काँग्रेस) 86,413
  • विलासराव जगताप - (भाजप) 52,034

जत विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं ही मोठ्या प्रमाणावर आहेत. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेटवर्कही चांगलं आहे. त्यामुळेच एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्यरत असलेले आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी दिली होती. 

दुसरीकडे काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत हे विश्वजीत कदम यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच सावंत यांच्या पाठीशी विश्वजीत कदम यांनी पूर्ण ताकद लावली होती.

पाण्याची समस्या गंभीर

जत तालुक्यात पाण्याची मोठी समस्या आहे. हा तालुका नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. जत तालुक्याच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागून आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या प्रदेशात पाण्यामुळे शेती हिरवीगार आहे. तर त्यालाच लागून असलेल्या जतमध्ये मात्र पाण्याची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यात ही स्थिती अतिगंभीर बनते. त्यामुळेच जतमधील 48 गावांनी मधल्या काळात कर्नाटकात जाण्याचा ठराव मंजूर केला होता. 

ही बातमी वाचा  :