Shivsena BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनावेगआलाआहे. एकीकडेप्रचाराचासुपरसंडेअसल्यानेजवळजवळसर्वचराजकीयनेत्यांनीप्रत्यक्षमैदानातउतरूनसभांचाआणिप्रचाररॅलीचाधडाका लावलाआहे. अशातचआताशिवसेनाशिंदेगटाच्यागोटातूनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. मुंबईतील सर्वात जुन्या आणि मानाच्या जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) शिवसेनेलापाठिंबादिलाआहे. जय जवान दहीहंडी पथकातील सुमारे एक हजार गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणारआहे. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हापक्ष प्रवेश होणारअसल्याचीमाहितीआहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)

Continues below advertisement

दरम्यान, दोन ठाकरे बंधू एकत्र येत असताना जय जवान दहिहंडी पथकाच्या वतीने थर लावून सलामी दिली होती. त्यानंतर मात्र मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत एक हजार गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचीमाहितीपुढेआलीआहे. त्यामुळेमहापालिकानिवडणुकापूर्वीशिवसेनेलामोठंपाठबळमिळाल्याचीचर्चाआहे.

BMC Election 2026 : ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर पार पडणार

Continues below advertisement

दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतोय. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर, म्हणजेच शिवाजी पार्कवर पार पडतेय. सध्या मैदानावरची तयारी पूर्ण झाली आहे. मोठ्या प्रमाणावर आसन व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या स्टेजवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, तो स्टेज पूर्णपणे सज्ज आहे. या स्टेजवर ठाकरे बंधूंचा मोठा फलक लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र ठेवण्यात आलं आहे, जे या सभेचं प्रतीकात्मक महत्त्व अधिक अधोरेखित करतंय.

यासोबतच, सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही लावण्यात आल्या आहेत. ‘लाव रे तो व्हिडिओ’मधून नेमकं काय दाखवलं जाणार, ठाकरे बंधू काय संदेश देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईच्या राजकारणात आणि विशेषतः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा किती महत्त्वाची ठरते, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

BMC Election 2026 Mahayuti Manifesto: वचननाम्यातील काही महत्त्वाच्या घोषणा 

- मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार 

- पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये 

- बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार 

- सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार 

- फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार 

- लघु उद्योग धोरण राबवले जाणार 

- पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार 

- बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस 

- बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत 

- बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार 

- स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार 

- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी व लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज 

- रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार 

- पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार 

- मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार 

- बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार 

- पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार 

- हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार 

- रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार 

- विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार

संबंधित बातमी: