DMK and AIADMK Secret Negotiations an Alliance: अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 234 पैकी 108 जागा जिंकून दमदार पदार्पण केले आहे. विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी, बहुमतासाठी आवश्यक 118 आमदारांच्या तुलनेत त्यांच्याकडे सध्या केवळ 112 आमदारांचा पाठिंबा आहे. एका बाजूला विजय यांना मुख्यमंत्री करण्यासाठी AIADMK फुटीची चर्चा सुरु असतानाच तमिळनाडूत सुद्धा महाविकास आघाडी होणार का? याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. 

Continues below advertisement

DMK आणि AIADMK यांच्यात गुप्त चर्चा?

थलापती विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी तामिळनाडूतील दोन पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी, DMK आणि AIADMK यांच्यात गुप्त चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणात हे दोन पक्ष नेहमीच एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत, त्यामुळे ही संभाव्य युती ऐतिहासिक ठरू शकते. 2019 मध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्याने महाराष्ट्रात नव्हे देशात खळबळ उडाली होती. त्यामुळे तोच प्रयोग होणार का? याची चर्चा रंगली आहे. 

दोन्ही पक्षांच्या जागांचे समीकरण

तमिळनाडू निवडणुकीत DMK ला 59 आणि AIADMK ला 47 जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्ष एकत्र आले, तर त्यांच्या आमदारांची एकूण संख्या 106 होईल, जी बहुमताच्या (118) आकड्यापेक्षा अजूनही 12 ने कमी आहे. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी इतर छोट्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागेल. दुसरीकडे, 'विदुथलाई चिरुथाईगल कात्ची' (VCK) आणि डाव्या पक्षांसारख्या छोट्या पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे पक्ष सध्या DMK च्या नेतृत्वाखालील युतीचा भाग आहेत आणि DMK ला विश्वास आहे की ते विजय यांच्या बाजूने जाणार नाहीत.

Continues below advertisement

दोन्ही पक्षांच्या वादाचा मोठा इतिहास

1972 मध्ये एम.जी. रामचंद्रन यांना DMK मधून काढून टाकल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये दशकांचे शत्रुत्व आहे. मात्र, विजय यांच्या पक्षाच्या प्रभावामुळे हे दोन कट्टर विरोधक एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत. DMK नेते एस.ए.एस. हफीझुल्ला यांनी ट्विट केले आहे की, "तुम्हाला लवकरच जी बातमी ऐकायला मिळेल ती तामिळनाडू आणि लोकशाहीसाठी चांगली असेल," ज्यामुळे युतीबाबतच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे.

234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 आमदार

दुसरीकडे, विजय यांनी बुधवारी लोक भवनात राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तथापि, विजय यांनी केवळ 113 आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केली. विजय यांनी आपला पाठिंबा सादर करण्यासाठी वेळ मागितला. 234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत. विजय यांनी दोन जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे एक जागा गमावल्यास एकूण संख्या 107 होईल. 233 जागांसहही बहुमत 118 राहील, त्यामुळे टीव्हीकेला आणखी 11 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या