मावळ मतदारसंघातील जनतेनं दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. आता सर्वांनी विधानसभेला तयारीला लागण्याचे आदेश देखील अजित पवारांनी दिले आहे. तसेच राज्यात दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही बैठकीत चर्चा केली आहे.
EXCLUSIVE | पार्थ पवार यांच्याशी खास बातचीत | एबीपी माझा
मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा तब्बल दोन लाख 15 हजार 913 मतांनी विजय झाला. तर मावळमध्ये पार्थ पवरांना 503375 मते मिळाली आहेत. तर विजयी खासदार बारणे यांना 718950 मते मिळाली आहेत.
पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदार संघातील लढत राज्यभर चर्चेत होती. अजित पवार यांनी स्वत प्रचारात लक्ष घातले होते. मात्र, पवारांच्या पार्थला राजकीय चक्रव्यूह भेदण्यात अपयश आले आहे. म्हणून अजित पवार यांनी पार्थ पवारच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
VIDEO | ..म्हणून पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी : प्रफुल पटेल | तोंडी परीक्षा | एबीपी माझा