अकोला: अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे हर्षल साबळे विजय झाले आहेत. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढाईत त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा 718 मतांनी पराभव केला. मात्र, या पराभवानंतर भाजपचे आमदार हरीष पिंपळे यांनी हर्षल साबळे यांच्या पराभवासाठी पक्षातीलच काही घरभेद्यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय.
Harish Pimpale : हरीष पिंपळे काय म्हणाले?
हर्षल साबळे हे आमदार हरीष पिंपळे यांच्या कट्टर समर्थक समजले जातात. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील त्यांच्या विरोधात काम करणाऱ्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाने निलंबित केलं होतं. यात मावळत्या नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांचे पती कमलाकर गावंडे यांचाही समावेश होता. निलंबित झालेले चारही पदाधिकारी हे भाजपातील धोत्रे समर्थक समजले जातात. या पार्श्वभूमीवर आमदार हरीष पिंपळे यांनी केलेल्या आरोपांची मोठी चर्चा भाजपा आणि राजकीय वर्तुळात सुरु आहे. साबळे यांच्या विजयाने घरभेद्यांना त्यांनी जोरदार चपराक लावत मूर्तीजापूरच्या जनतेने चांगलाच धडा शिकवल्याचं आमदार हरीष पिंपळे म्हटलंय.
भाजपनं 2025 सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीसाठी मतदाराचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं हर्षल साबळे यांना उमेदवारी दिली होती. हर्षल साबळे यांनी पन्ना प्रमुख पदापासून मेहनत करत भाजपमध्ये मुर्तिजापूर शहराध्यक्ष पद मिळवलं होतं. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण लागल्यानंतर हर्षल साबळे याचं नाव सुचवलं होतं. त्यावेळी हर्षल साबळे यांचंं नाव सूचवल्यानंतर अनेक लोकांनी टीका टिपण्णी केली होती, असं हरीष पिंपळे म्हणाले.
हर्षल साबळेच्या माध्यमातून भाजपला मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी मिळाला आहे. काही भाजपच्या घरका भेदी लंका ढाय अशी लोकं हर्षलच्या विरोधात होती. ती हर्षलच्या विरोधात नव्हती ती हरीष पिंपळेच्या मागं होती, असं आमदार पिंपळे यांनी म्हटलं. मूर्तिजापूरच्या विकासासाठी हर्षल साबळे कमी पडणार नाहीत, असं हरीष पिंपळे यांनी म्हटलं. हा विजय मतदार आणि कार्यकर्त्यांना समर्पित करतो, असंही पिंपळे म्हणाले.
2024 ला कार्यकर्त्यांनी तिकीट आणून मला विजयी केलं. हर्षल साबळे याला मूर्तिजापूरच्या विकासासाठी साथ देणार असल्याचं हरीष पिंपळेंनी म्हटलं. हर्षल साबळे मूर्तिजापूरच्या जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतील, असं हरीष पिंपळे म्हणाले.
मुर्तिजापूरमध्ये विजयी झालेले भाजपचे नगराघ्यक्ष हर्षल साबळे यांना पराभूत करण्यासाठी भाजपमधीलच काही घरभेद्यांनी प्रयत्न केले असा गंभीर आरोप भाजप आमदार हरिष पिंपळे यांचा पक्षातील काही लोकांवर केला आहे. भाजपमधील विरोधी गट यावर काय उत्तर देतो ते पाहावं लागेल.