Opinion Poll: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांचं (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजलं आहे. गुजरातवर (Gujarat News) सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यंदा गुजरात निवडणुकीत मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात असल्याचं पाहायला मिळतंय. आप, भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांचे नेते जाहीर सभा आणि रॅलींद्वारे जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, माध्यमांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्वेक्षण करत आहेत. अशातच एका सर्वेक्षणामधून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. 

दिल्ली, पंजाब यानंतर आता आम आदमी पार्टीचं लक्ष्य गुजरातवर आहे. राज्यात पहिल्यांदाच निवडणूक लढवणारा आम आदमी पक्ष किती जागा जिंकणार, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. आप गुजरातमधील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासंदर्भात गुजरातच्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण पार पडलं. रिपब्लिक इंडिया आणि P-MARQ च्या ओपिनियन पोलमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पार्टी विधानसभेच्या सर्व जागांवर किती जागा लढवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाहुया सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष... 

राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? 

भाजप : 127-140
काँग्रेस : 24-36
आप : 9-21
इतर : 0-2 

कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार? 

पक्ष मतं (टक्क्यांमध्ये)          
भाजप   46.2      
काँग्रेस  28.4    
आम आदमी पार्टी 20.6
अन्य  4.8 

                
दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. एक आणि पाच डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. तर गुजरात विधानसभेचा निकाल हिमाचल प्रदेशसह 8 डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरातच्या एकूण 182 सदस्यीय विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर आणि दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांवर मतदान होणार आहे. गुजरातमध्ये गेल्या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने सलग विजय मिळवला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gujarat Election 2022: भाजपसाठी सोपी नाही गुजरात निवडणूक, काँग्रेसला बसणार धक्का; नव्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष