Girish Mahajan : हेवे दावे बाजूला ठेवून मालेगाव भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. मालेगाव महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवायचा असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan ) यांनी केले. मालेगाव येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. आता आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, त्यामुळं जेवढ्या जगा दिल्या आहेत, तेवढ्या सर्व जागा निवडून आला असे महाजन म्हणाले.
मालेगाव महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवायचा असल्याचे मत मंत्री गिरीश महाजन यांनी केले. भाजपाने जेवढ्या जागा दिल्या आहेत, त्या सर्वच सर्व जागा महापालिका निवडणुकीत निवडून आणा आहे असे आवाहनही गिरीश महाजन यांनी केले. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने 22 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली त्यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलत होते. दरम्यान, युतीच्या चर्चेत सन्मानाने जागा मिळाल्या नाही म्हणून आपण स्वबळावर मालेगावात निवडणुका लढवत आहे असेही महाजन यावेळी म्हणाले.
मालेगाव महापालिका माघारीनंतर प्रचाराच्या रणधुमाळी आता सुरवात झाली आहे. इस्लाम पार्टीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झालीय. 84 जागांसाठी एकूण 301 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहे. मुस्लिम बहुल मालेगाव शहराची प्रामुख्याने पूर्व - पश्चिम अशी सरळ विभागणी झालीय.सर्वाधिक 64 जागा मुस्लिम बहुल भागात आहे.तर अवघ्या 22 जागा हिंदूबहुल पश्चिम भागात आहे.सर्वच राजकीय पक्षांना सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीये.पूर्व भागात आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या एमआयएम व माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टीमध्ये प्रमुख लढत आहे. इस्लाम पार्टीने समाजवादी पार्टीला साथीला घेत सेक्युलर फ्रंटची स्थापना आहे. काही ठिकाणी काँग्रेसचे आव्हान असेल. तर पश्चिम भागात महायुतीमधील शिवसेना व भाजप एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे.तर शिवसेना ठाकरे , मनसे, राष्ट्रवादी अजित पवार , राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसेनेही काही जागांवर आपले उमेदवार उतरविले आहे.
21 प्रभागांतील 84 जागांसाठी ही निवडणूक होणार
राज्यातील 29 महानगरपालिकांसह मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय लढतींपैकी एक असलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार असून, 21 प्रभागांतील 84 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1100 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते. आगामी निवडणुकीत 21 प्रभागांमधून 84 नगरसेवक निवडले जाणार असून, त्यासोबत पाच स्वीकृत सदस्य असतील. त्यामुळे सत्तेची गणिते अधिकच रंजक ठरण्याची शक्यता आहे.
मालेगाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी शहर आहे. हातमाग, कापड उद्योग आणि व्यापारी केंद्र म्हणून मालेगावची ओळख जुनी आहे. लोकसंख्या आणि शहराचा विस्तार वाढत गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची गरज निर्माण झाली. मालेगावमध्ये सुरुवातीला नगरपरिषद (Municipal Council) अस्तित्वात होती. नगरपरिषद काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, कर वसुली, प्राथमिक सेवा या कामांची जबाबदारी नगरपरिषदेकडे होती. औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे नगरपरिषद अपुरी पडू लागली. 17 डिसेंबर 2001 रोजी मालेगाव नगरपरिषदेला अधिकृतपणे महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. यानंतर मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) अस्तित्वात आली. ही महानगरपालिका Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 अंतर्गत कार्यरत आहे.