ठाणे : माजीमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. "वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो," असं सूचक वक्तव्य गणेश नाईक यांनी आज नवी मुंबईतील आयोजित सायक्लोथॉनच्या वेळी केलं.

स्वच्छ पर्यावरण पूरक आणि आरोग्यमय मुंबई चा संदेश देण्यासाठी आज नवी मुंबई महासायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेश नाईक यांनी या सायक्लोथॉनचं आयोजन केलं होते.

गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभेसाठी ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच केली होती. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता नाईक कुटुंबांनी लोकसभा निवडणूक लढवणार का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

मात्र आता गणेश नाईकांच्या या सूचक वक्तव्यानंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.