एक्स्प्लोर

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथ शिंदे साहेबांनी..

शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचं ग्रहण लागणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल मंगेश चिवटे यांनी कोणत्याही स्थितीत उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

Pune Teacher Constituency: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक पदवीधर मतदारसंघातून कौस्तुभ गावडे विरुद्ध विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. काँग्रेसकडून जयंत आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीला बंडखोरीचा फटका बसणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटातून दोन माजी ओएसडी उमेदवारीच्या स्पर्धेत होते, मात्र दोघांनाही उमेदवारी मिळालेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून शड्डू ठोकला होता. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार त्यांनी केला होता. मात्र उमेदवारी मिळालेली नाही. हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेला आहे.   

शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचं ग्रहण?

दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी सुद्धा या मतदारसंघातून शड्डू ठोकला होता आणि ते सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये होते. मात्र, कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी मिळाली आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक असे दोन्ही मतदारसंघ हे भाजपला सुटले आहेत. पुणे पदवीधरमधून स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शिक्षक मतदारसंघात बंडखोरीचं ग्रहण लागणार का? याकडे सुद्धा लक्ष असेल मंगेश चिवटे यांनी कोणत्याही स्थितीत उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. आज थेऊरमध्ये शिक्षकांचा मेळावा घेतल्यानंतर मंगेश चिवटे यांनी भूमिका स्पष्ट केली. 

शिवसेनेचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला

मंगेश चिवटे म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या मंगळवारी सकाळी 11 वाजता जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहोत. शिंदे साहेब जे आदेश देतील, ते आम्हाला शिरसावंद्य आहेत. जो निर्णय देतील तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अर्थातच मान्य आहे. त्यांनी सांगितले की, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेचा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. आमची मागणी होती की पुणे पदवीधर भाजपला आणि पुणे शिक्षक शिवसेनेला मिळावा, परंतु तसं झालेलं नाही. त्यांनी सांगितले की, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा खूप मोठा आग्रह आहे, शिक्षकांचं खूप मोठं समर्थन आहे आणि त्यांचा एक दबाव आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आपण निवडणुकीला सामोरं जायचं. शिंदे साहेबांनी देखील अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे आम्ही अर्ज भरणार आहोत. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Gokul Election 2026: गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
गोकुळचे महायुतीचे संचालक पुन्हा सहलीवर; मुंबईमार्गे अलिबागला रवाना, गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच अद्यापही कायम, घडामोडींना वेग
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
अमेरिकेच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मिशिगनमधून पहिला मुस्लीम सिनेटर जिंकला, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती होती तेच घडलं
Advertisement

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो! गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
दिवाळीच्या फटाक्यांना ब्रेक! मुंबई आणि ठाण्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास कारवाई
Dharashiv Fire Incident News: पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
पाय मृतदेहापासून वेगळे झाले, नारळाचे आणि पिंपळाचे झाडही शेंड्यापर्यंत जळाले; धाराशिवमधील करंडे कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक घटना
Embed widget