एक्स्प्लोर

Maharashtra CM News: अमित शाहांसोबत बैठक तर झाली; पण तो एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद...

Eknath Shinde Maharashtra CM News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे.

Maharashtra CM: सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. काल दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे ठरलं आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती देखील आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. 

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार?

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. आज मुंबईत पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा रंगली होती. अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या दिल्लीतील बैठकीनंतर देखील एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, यावर अद्याप उत्तर मिळालेलं नाही. 

उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं-

राज्यातल्या नव्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास एकनाथ शिंदेंनी ते स्वीकारावं अशी गळ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना घातल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंची ठाण्यातली पत्रकार परिषद झाल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंना तशी विनंती केल्याचं समजतं. काल दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंची शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत बैठक झाली. आपण सत्तेत राहूनच सरकार चालवावं असा सूर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबतच्या बैठकीत आळवला. त्यामुळं शिंदे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत-

आता कालच्या बैठकीनंतर सत्तास्थापना नाट्याचा दुसरा अंक आज मुंबईत रंगणार आहे. महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार आहे. अमित शाहांनी केलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात निरीक्षक येणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, शपथविधी कधी होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. 

शिवसेना, राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी?

शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल,तर शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्रिपदाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित, VIDEO:

संबंधित बातमी:

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसमोर एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली; अमित शाहांसमोर मोठी मागणी केली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात जावई सासरवाडीच्या लोकांना लॉजवर महिलेसोबत रंगेहाथ सापडला अन्.. माझा पाठलाग करता का? म्हणत..
कोल्हापुरात जावई सासरवाडीच्या लोकांना लॉजवर महिलेसोबत रंगेहाथ सापडला अन्.. माझा पाठलाग करता का? म्हणत..
Kolhapur News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
Yashwant Varma : राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Wedding: जूनं ते सोनं, कित्येक वर्षानंतर अवतारले बैलगाडीत बैलाच्या घुंगराच्या नादात वऱ्हाडPalghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघातSayaji Shinde on Devrai : देवराईसाठी पिंक पेरूची 1 झाडं भेट, सयाजी शिंदेंच्या आवाहनाला प्रतिसादVirat Kohli RCB Champion | आरसीबी पहिल्यांदा चॅम्पियन, विराटच्या अश्रुंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरात जावई सासरवाडीच्या लोकांना लॉजवर महिलेसोबत रंगेहाथ सापडला अन्.. माझा पाठलाग करता का? म्हणत..
कोल्हापुरात जावई सासरवाडीच्या लोकांना लॉजवर महिलेसोबत रंगेहाथ सापडला अन्.. माझा पाठलाग करता का? म्हणत..
Kolhapur News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; लग्नास नकार देताच कोल्हापुरात भयंकर कृत्य
Yashwant Varma : राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
राहत्या घरात नोटांचा खजिना सापडलेल्या न्यायमूर्तींना तगडा झटका देण्याची तयारी; केंद्रीय मंत्र्यांना मोठी जबाबदारी
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Palghar Chemical Tanker Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात
Walmik Karad & Jalindar Supekar: मोठी बातमी: जालिंदर सुपेकरांचं 'आका'शी कनेक्शन? वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका, अंजली दमानियांचा आरोप
मोठी बातमी: जालिंदर सुपेकरांचं 'आका'शी कनेक्शन? वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका, अंजली दमानियांचा आरोप
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
ट्रम्पचा एक फोन येताच मोदींनी जी हुजूर शरणागती पत्करली, भाजप आरएसएसचा हाच इतिहास, स्वातंत्र्यांपासून यांना शरणागतीची चिट्टी लिहिण्याची सवय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Josh hazlewood RCB Wins: कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
कृणालने 2 विकेट घेतल्या, पण पंजाबची अभेद्य तटबंदी कोणी फोडली, फायनल स्पेशालिस्ट खेळाडू आरसीबीच्या विजयाचा खरा शिल्पकार
Solapur Crime News: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
Embed widget