कोल्हापूर : एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं वक्तव्य एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतं देण्याचं आवाहन केलं. एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावं लागतं. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणानं करतो, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde On Sanjay Mandlik : संजय मंडलिक एकटे नाहीत

कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आली आहेत. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे आणि या लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते. सत्तेसाठी एकत्र आला असला तरी जनता ठरवते कुणाला आपलं मत द्यायचं असं शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : लवकरच 2100 रुपये देणार

लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही पक्षाचा पाया रचणारी निवडणूक आहे.  मी आज नेहमी सारखं भाषण करणार नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर प्रचारला आलो आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.

नगरपरिषद आणि महानगरपालिका पालिका निवडणुकीत शिवसेना राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार आहेत आणि एक खासदार आहे. संजय मंडलिक गेल्या वेळी थोडक्यात सुटले, पुढच्या वेळी नक्की बरोबर पकडतील असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचा: