पर्यटन, रोजगार, ते वाहतूक कोंडी, एकनाथ शिंदेंनी सांगितला नाशिकच्या विकासाचा प्लॅन, विरोधकांवर हल्लाबोल
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. नाशिक शहराचा विकास करावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
Eknath Shinde : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास करण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. नाशिक शहराचा विकास करावा यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. नाशिकचा कुंभ देखील ऐतिहासिक होईल यासाठी काम करत आहोत. रिंग रोड, आरोग्य सेवा, करायच्या आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. तपोवन वाचवा ही तुमची भूमिका आहे, पर्यावरणाचा समतोल राखून आपण कुंभ करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
गोदामाई प्रदूषण मुक्त करणार
गोदामाई प्रदूषण मुक्त करणार आहे. पर्यटन क्षेत्र विकास, रोजगार, नाशिकमध्ये मुंबई, ठाणे प्रमाणे 500 चौरस फुटापर्यंत आपण कर माफी करु असे एकनाथ शिंदे म्हणाले. नगरविकास विभाग माझ्याकडे आहे. आपण हे सर्व निर्णय आचारसंहितें नंतर लगेच घेऊ. सिडकोचे घर फ्री होल्ड करु, गोदावरी नदीचे नियोजन करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. सिडकोच्या 25 हजार पेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होईल मुंबई नाका आणि द्वारका चौक वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवू. MIDC मधील प्रश्न आपण तत्काळ सोडवू. नाशिकचे वाचनालय सुरू करण्याचे काम करु तसेच सायखेडकर नाट्यगृह नव्याने सज्ज करुअसे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. NMRD ची स्थापना केली, लोकांना सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आपण काम करतोय असे एकनाथ शिंदे म्हणाले.
2022 मध्ये सत्तापालट झालं, तेव्हा जनतेचे सरकार आलं
बाळासाहेब ठाकरे आरोग्य दवाखाना सर्वाधिक प्रमाणात सुरू केले. लाडकी बहीण, लखपती योजना, मुलीचे शिक्षण हे निर्णय घेऊ. 100 टक्के सवलत हे निर्णय आपण घेऊ. 2022 मध्ये सत्तापालट झालं, तेव्हा जनतेचे सरकार आलं असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही केलेलं काम बोलत आहे. नाशिक काही लोकांनी दत्तक घेतले होते असा चटटोला एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करु. आमचा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जन्माला आलो आहोत.
नाशिकमध्ये बदल घडणार, वार बदललंय असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मी माहित घेतोय सर्व आपले उमेदवार ताकदवर आहेत. प्रभू रामचंद्रांचं शस्त्र धनुष्यबाण आहे. जो रामाचं नाही तो काही कामाचा नाही. आमची युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही तर नाशिकच्या विकासासाठी आहे. तुम्ही सर्वांनी निर्धार करा नाशिकच्या विकासाचा नाशिकच्या प्रगतीचा असे एकनाथ शिंदे म्हणाले.




















