Dhule Lok Sabha Election Result 2024 : धुळे लोकसभा निवडणुकीत परसुळे (Parsule) येथील बूथ क्र. 26 व शिंदखेडा (Shindkheda) येथील बूथ क्र. 145 ही दोन्ही ईव्हीएम (EVM) खराब झाल्याने या बूथच्या मतांची मोजणी न करता थेट निकाल जाहीर करण्यात आला. हा लोकशाहीचा खून असून धुळे लोकसभा
निवडणुकीच्या निकालाला तात्काळ स्थगिती देऊन मालेगाव (Malegaon) शहरात झालेल्या एकतर्फी मतदान हे संशयास्पद आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परसुळे व शिंदखेडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Abhinav Goel) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) परसुळे बुथवर मतदान केले होते. परंतु मतमोजणी करताना परसुळे बुथवरचे मशिन खराब झाल्याचे सांगून या बुथची मतमोजणी न करता सरळ रात्री 11 वाजेच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला. यामुळे हा लोकशाहीचा खून झाल्यासारखा प्रकार आहे. असाच प्रकार धुळे ग्रामीण मतदारसंघातील काही गावांच्या बुथवर देखील झाल्याचे सांगण्यात आले आहे.


उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी 


याबाबत भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांनी निवडणुक निर्णय अधिकारी तसेच निवडणुक निरीक्षक यांच्याकडे तशी मागणी करून देखील ती फेटाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारा असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी. त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 6 मतदारसंघ असून मालेगाव शहर वगळता सर्वच ठिकाणी भाजपाला भरभरून मते मिळाली आहेत.  


बूथ हायजॅक केल्याचा आरोप


मालेगाव शहरातील बुथचे आकडे हे संशय निर्माण करणारे असून त्याठिकाणी मिळालेल्या फेरीनिहाय मतांमध्ये भाजपाला 10 ते 150 मते तर  काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 10 ते 12 हजार एवढी प्रचंड प्रमाणात मते मिळाली आहेत. या मतांची बेरीज केली तर 1लाख 98 हजार 500 मते ही काँग्रेसला तर केवळ 4 हजार  500 मते ही भाजपाला मिळाल्याचे दिसून येते. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी सरळसरळ बूथ हायजॅक केल्याचा प्रकार दिसून येत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिलेल्या निकालाला तात्काळ स्थगिती द्यावी. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी परसुळे येथील ग्रामस्थांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Manikrao Kokate on Ajit Pawar: अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू; दादांच्या आमदारानं स्पष्टच सांगितलं