लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले आहे. त्यांची लढत नेमकी कोणाशी होती हे मात्र मतदानाच्या आकडेवरुन स्पष्ट होत नाही. कारण धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं आहे. मतदारांनी तब्बत 26,899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत.


लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना 1 लाख 31 हजार 321 मतांना विजयी झाले आहेत. त्यांनंतर नोटाला 26,899 मतं मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13113 मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12,670 मतं मिळाली आहे. मात्र याठिकाणी नोटाला एवढी मतं मतदारांनी का दिली? याबाबत विचार करणे गरजेचं आहे.



शिवसेनेच्या अनोळखी उमेदवाराची चर्चा


याठिकाणी निवडणुकीतील उमेदवार ठरले त्याचवेळी धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणुक सोपी बनली होती. शिवसेनेने आपला उमेदवारी जाहीर केला त्यावेळी मतदारसंघातील जनतेला या उमेदवाराबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे नेमके हे सचिन देशमुख कोण? याचा शोध लोकांनी सुरु केला होता. सांगलीतील शिवसेनेचा आणि त्यांचा सचिन देशमुख यांचा काहीही संबंध नव्हता.


लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असल्याने रमेश कराड इच्छुक होते. मात्र शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्याने सचिन देशमुखांना येथे उमेदवारी मिळाली. 2014 साली शिवसेना व भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेकडून रेणापूरचे सरपंच हरी साबदे विधानसभेसाठी उभे राहिले. त्यांना 2200 मतं मिळाली होती. तर भाजपाच्या रमेश कराड यांना 93 हजार मते मिळाली होती. या मतदारसंघात भाजपाची शक्ती मोठी आहे.