परळी :  21 ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानासाठी परळी शहरात भाजपकडून मतदारसंघाबाहेरील असंख्य गुंड प्रवृत्तीचे लोक बोलवण्यात आले आहेत, अशा मतदारसंघाबाहेरील व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळी शहर आणि मतदारसंघात फिरण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.


परळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवावा, संवेदनशील असलेल्या शहरातील बुथ क्रमांक 162, 163 बोरणा ऑफीस पश्‍चिम बाजू येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणात शहरात आणण्यात आली आहेत, त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेत आडथळा आणला जावू शकतो, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील त्या लोकांना फिरण्यास प्रतिबंध करावा. आमच्या विरोधातील उमेदवार स्वतःच स्वतःच्या लोकांकडून हल्ले करवून घेवून त्यात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ एक व्हिडीओ कॅमेरामन देऊन काही घटना घडल्यास त्याचे चित्रीकरण करावे आणि त्यांनाही विशेष पोलीस सुरक्षा द्यावी, जेणेकरून खोट्या तक्रारी होणार नाहीत, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या
मतदारसंघातील संवेदनशील गावे भोपळा, मांडेखेल, गोपाळपूर, साबळा कौडगाव अशा संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा विरोधकांचा डाव आहे, त्यामुळे तेथेही विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा आदी मागणी करण्यात आल्या आहेत. डे यांच्या वतीने त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन दिले आहे.  तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि निवडणूक आयोगालाही याबाबत कळवले आहे.

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून परळीत तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान सदर व्हिडीओ क्लिप बनावट असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर नवीन भावांनी आमच्यात विष कालवले असून जगावं की मरावं या मनस्थितीत असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. काल, महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये त्यांची शेवटची सभा घेतली.  या सभेत भाषण केल्यानंतर स्टेजवरच त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता.

धनंजय मुंडेंवर योग्य ती कारवाई केली जाईल, 'त्या' वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल