Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात, निमंत्रण पत्रिकेवर 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी' असा उल्लेख करण्यात आलं आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सत्तारोहणापूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून धार्मिक अनुष्ठान-
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या दर्शनाला पोहचले. शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत देवदर्शन केलं. देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या चरणी लीन झाले. तर सागर बंगल्यावर होणार गोमातेचं पूजन करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पूजेसाठी गाय आणण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वेळात बंगल्यावर पोहचतील. त्यानंतर गोमातेचं पूजन केलं. देवेंद्र फडणींवीसांनी गौमातेची पूजा केली. बळीराजाचं राज्य यावं म्हणून ही पूजा करण्यात आली आहे. गीर आणि खिल्लार प्रजातीची गाय आण्यायात आली होती.
महंत सुधीरदास महाराज काय म्हणाले?
आम्ही सर्व साधू महंत आणि महाराज यांनी काढून दिलेल्या मुहूर्तावरच आजचा शपथविधी होत आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर हा शपथविधी होत असल्याने हे सरकार निर्भिग्नपणे पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल. आजच्या शपथविधी आम्ही 300 साधू महंत व्यासपीठावर असणारा आहोत. आमच्या नवीन सरकारसाठी शुभेच्छा आहेत. आज तीनच लोकांनी शपथ घेतली तरी त्याचा काहीही फरक या सरकारवर पडणार नाही, असं महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले.
12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा-
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे भगव्या रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत.