मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेप्रमाणे शपथविधी झाला की मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहार संघाशी वार्तालाप केला. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचे आभार मानतो, शपथविधीनंतर निमंत्रित केलं, स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार असं म्हटलं. प्रविण आणि प्रमोद यांची बॉडी असते तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, असं ते म्हणाले. 2029 ला देखील त्यांचीच बॉडी असावी, अशा सदिच्छा देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विधिमंडळ, मंत्रालयातून राज्याचा कारभार चालतो, तो योग्यप्रकारे चाललाय की नाही ते राज्यात सांगण्याचं काम तुम्ही करता
जिथं काही चुका असतील त्या नजरेस आणून देण्याचं काम करता, त्यामुळं त्या सुधारता येतात, असं देवेंद्र फढणवीस म्हणाले.एखादी गोष्ट जनोपयोगी असेल ती जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता, एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते, आणि ती जनतेपर्यंत जाते, मग कळतं की असं काही तरी घडलेलं आहे मग आम्हाला फायर फायटिंग करावी लागते, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
आमचे रोल बदलले, दिशा तीच राहणार
गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार चालवलं, ते अतिशय गतीशील सरकार होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय, मी समजावून सांगितलं , अडीच वर्षात महाराष्ट्रानं विकासाची गती घेतली आहे, या विकासाच्या गतीला पुढं नेऊ, त्या गतीनं महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल. पायाभूत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहील, असा विश्वास व्यक्त करतोय, जरी आमचे रोल बदलले असले, 2014 ला मी मुख्यमंत्री होतो, शिंदे साहेब आमच्यासोबत होते.
2019 ला 72 तासांसाठी मी मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे, अजितदादा, शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळं रोल जरी आमचे बदलले असले तरी दिशा तीच राहणार आहे, गती तिच राहणार आहे, समन्वय तोच राहणार आहे, याच्यामध्ये वेगळेपण पाहायला मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळात आम्ही आलो तेव्हा शिंदे आणि मी आलो तेव्हा 50 ओव्हरची मॅच होती, अजितदादा आल्यानंतर टी 20 मॅच होती, आता कसोटी मॅच आहे, आता नीट पायाभरणी करत, राज्याला पुढं न्यायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या :